एक्स्प्लोर

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, सेवेकरी विनायक दुधाळे ताब्यात

इंदूरच्या आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये विनायक दुधाळे आणि इतर आठ ते दहा जणांची कसून चौकशी केली जात आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांच्या विश्वासतला सेवेकरी होता‌.

भोपाळ : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात जवळपास गेले साडेतीन महिने बेपत्ता असलेला विनायक दुधाळे सापडला आहे. इंदूर पोलिसांनी आज रात्री आठ वाजता विनायकला ताब्यात घेतलं. इंदूरच्या आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये विनायक दुधाळे आणि इतर आठ ते दहा जणांची कसून चौकशी केली जात आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांच्या विश्वासतला सेवेकरी होता‌. मात्र जून महिन्यात भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर तो गायब झाला होता. भय्यू महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि धमकावणाऱ्या कैलास पाटीलने विनायक दुधाळे हा शरद देशमुख, शेखर पंडित आणि पलक नावाच्या महिलेच्या सहाय्याने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तेव्हापासून इंदूर पोलिस विनायकचा शोध घेत होते. भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला अचानक नवीन वळण लागलं. भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर 'माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा', असा उल्लेख आहे. भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावाही आयुषी आणि कुहू यांनी केला होता. ब्लॅकमेलिंगमुळे विवंचनेत असलेल्या भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा संशय दोघींनी व्यक्त केला होता. पोलिसांच्या ताब्यात असलेला पूर्वीचा ड्रायव्हर कैलास पाटीलला या कटकारस्थानाची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला होता. यानुसार कलम 164 अंतर्गत कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली होती. कैलासचा जबाब काय? 'भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. फूटी कोठी भागात राहणारी तरुणी याची सूत्रधार आहे. ही तरुणी भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी येत असे. तिने महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले आणि अश्लील व्हिडिओ तयार केला. डॉ. आयुषी शर्मांसोबत लग्नानंतर तिचं घरी येणं-जाणं बंद झालं. मात्र तिने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यू महाराजांकडून दरमहा दीड लाख रुपये उकळण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवक विनायक दुधाळे आणि शेखरही सहभागी झाले. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरुणीशी संपर्क केला जात असे.' असा जबाब कैलासने दिल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. कोण आहे विनायक? -विनायक दुधाळे हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे -विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे -भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे -विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget