Congress Bharat Jodo Yatra:  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे.  भारत जोडो (Bharat Jodo Yatra)  यात्रेदरम्यान बुलढाणा (Buldhana)  जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथे 18 नोव्हेंबर रोजी ही यात्रा येणार असून शेगावात याची दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभा होणार आहे.  सभेच्या व यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) , माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)  , चंद्रकांत हंडोरे , यशोमती ठाकूर अशा बड्या नेत्यांसह अनेक नेते शेगावात तळ ठोकून यात्रेच व सभेच नियोजन करताना दिसून येत आहेत.


बुलढाणा जिल्ह्यात ही पदयात्रा तीन दिवस असणार आहे.  त्यामुळे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळाची पाहणी करणे , आगमन व निर्गमन रस्त्यांची पाहणी करणे यासाठी राहुल गांधींच्या पदायात्रेआधीच या नेत्यांची पदयात्रा शेगाव परिसरात दिसत आहे. या यात्रेला जवळपास सहा लाख लोकं येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होणार आहेत. 


 काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी  प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.  राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिचा शेवट होणार आहे. एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाईल. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागतील.  तर महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर त्यांच्या भोजन आणि न्याहारीसाठी मराठवाडा आणि खान्देशातील पाककृतींवर भर  देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी   भारत जोडोयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.