Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) आहेत. या दरम्यान राहुल गांधी यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. 


बालपणी राहुल गांधींनी आईला विचारला प्रश्न, सोनिया गांधीं म्हणाल्या...
राहुल गांधींनी वैयक्तिक मुलाखतीत सांगितले की, ते लहान असताना, त्यांनी एकदा त्यांच्या आई सोनिया गांधींना (Soniya Gandhi) विचारले होते की, 'मी सुंदर आहे का?' तेव्हा सोनिया गांधींनी प्रथम राहुल गांधींकडे पाहिले आणि म्हणाल्या,'नाही, तू ठीकठाक आहेस' यावर राहुल म्हणाले की, तेव्हापासूनच मी सरासरी दिसतो, हे माझ्या मनात कायमचे बसले आहे.


"माझी आई अशीच आहे. ती लगेच...."
राहुल गांधी पुढे म्हणाले, 'माझी आई अशीच आहे. ती लगेच सत्याचा आरसा दाखवते. माझे वडीलही असेच होते. माझे संपूर्ण कुटुंब असे आहे. कुठल्याच गोष्टीची अतिशयोक्ती करत नाही. तुम्ही काही बोललात, तर ते तुमच्यासमोर सत्य आणतात' दरम्यान, राहुल यांनी त्यांच्या मुलाखतीची लिंक सोशल मीडीयावर शेअर केली आहे.






''भाजपचे लोकं देखील बूट पाठवतात?''
राहुल यांनी YouTuber समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीची गोष्ट सांगितली. मुलाखतीदरम्यान राहुल यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनशैलीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, सहसा ते स्वतःचे बूट खरेदी करतात, पण आता त्यांची आई आणि त्यांची बहीण राहुल यांच्यासाठी बूट खरेदी करतात. राहुल गांधींनी सांगितले की, राजकारणात त्यांचे काही मित्र आहेत, जे त्यांना बूट पाठवतात. जेव्हा यूट्यूबरने त्यांना विचारले की, 'भाजपचे लोकं देखील तुम्हाला बूट पाठवतात का?' तेव्हा ते म्हणाले, "नाही नाही, ते फक्त माझ्यावर बूट फेकतात".


"राजकारण्यांना देव मानणे मला आवडत नाही"
या मुलाखती दरम्यान राहुल गांधींना विचारण्यात आले की, भारत जोडो यात्रे दरम्यान चालताना त्यांनी पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे. यावर ते म्हणाले की, राजकारण्यांना देव मानण्याची प्रवृत्ती मला वैयक्तिकरित्या आवडत नाही.


युट्युबरने विचारले, 'लोक तुमच्याकडून आशा ठेवतात का?', राहुल म्हणाले...
YouTuberने विचारले की इतके लोक तुमच्याकडून आशा ठेवतात हे जाणून तुम्हाला रात्री चांगली झोप येते का?.. या प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी म्हणाले, 'मी ते आशा म्हणून पाहत नाही, तुम्ही ते आशा म्हणून पाहता. मी ते नाते म्हणून पाहतो. मला त्यांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे.'


राहुल गांधी यांनी धार्मिक विचारांबाबत 'हे' वक्तव्य केले


राहुल गांधी म्हणाले की, "नक्कीच, मी देवावर विश्वास ठेवतो. ज्या देवावर माझी श्रद्धा आहे त्यावर माझा विश्वास आहे. ज्या देवाची रचना एखाद्या व्यक्तीप्रमाणे असेल, त्यावर माझा विश्वास नाही. हे माझे एक वैयक्तिक मत आहे, मला असे म्हणायचे आहे की शिव ही एक चांगली कल्पना आहे. शिव ही संकल्पना समजणे खूप कठीण आहे आणि मी त्या दिशेने वाटचाल करेन, शिव हा आत्मा आहे, जो अहंकाराच्या पलीकडे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत पहिल्यांदाच उतरणार राहुल गांधी, 'भारत जोडो'च्या विश्रांतीमध्ये घेणार दोन सभा