Government Mobile App: देशाची वाटचाल वेगाने डिजिटलायझेशनकडे सुरू आहे. अनेक सरकारी काम आता ऑनलाइन केले जातात. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने उमंग अॅप (Umang App) लाँच केले. या अॅपद्वारे तुम्ही अनेक गोष्टी ऑनलाइन करू शकता.


उमंग म्हणजेच युनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स. या अॅपद्वारे तुम्ही 100 हून अधिक सरकारी सुविधा घरबसल्या मिळू शकतात. कर जमा करण्यापासून पासपोर्ट मिळवण्यापर्यंत या अॅपद्वारे अर्ज करणे अगदी सहज करता येते. या अॅपद्वारे ईपीएफओ सेवा देखील मिळवता येते. अँड्रॉइड व्यतिरिक्त तुम्ही उमंग अॅप आयफोनवरही डाउनलोड करू शकता. अँड्रॉइड फोनवर उमंग हे गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते, तर अॅपल वापरकर्ते अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.


उमंग अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यात नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी, प्रथम अॅप ओपन करा. अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला नाव, मोबाईल नंबर यासारखे मूलभूत तपशील टाकावे लागतील. हे अॅपवर तुमचे प्रोफाइल तयार करेल. प्रोफाईल तयार केल्यानंतर, तुम्हाला त्यात लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला त्यात अनेक कॅटेगरी दिसतील. तुम्हाला वापरायची असलेली सेवेची श्रेणी निवडा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सर्च बारमध्ये सेवेचे नाव टाइप करून देखील ते शोधू शकता. यानंतर तुम्ही हवी असेल्या सेवेचा लाभ घेऊ शकता.


या अॅपवर नोंदणी करणे खूप सोपे आहे. अॅप ओपन केल्यानंतर, New User वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP आणेल. ते प्रविष्ट करून, तुम्ही MPIN सेट करा. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरे दिल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.


हे ही वाचा -