नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतर, महत्वाची उपकरणे आणि कच्च्या मालाचा पुरवठा करणे आवश्यक आहे असं मत भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि जॉईन्ट एमडी इला सुचित्रा यांनी व्यक्त केलं. त्या युरोपियन युनियन-भारत व्यापारी गोलमेज संमेलनात बोलत होत्या. 


इला सुचित्रा म्हणाल्या की, "पेटंट खुलं करण्यापेक्षा महत्वाचं आहे ते सहकार्य आणि कच्च्या मालाचा पुरवठा. त्यामुळे लसीच्या निर्मितीला गती मिळेल. ही गोष्ट साध्य झाली तर केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही कोरोना लसींची निर्यात करता येईल. भारतासारख्या विशाल देशात लसीकरण करायचं असेल तर संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे." 


भारत बायोटेकची लस ही आता अमेरिकेत देण्यात येत आहे आणि तिला जर युरोपमध्ये मंजुरी मिळाली तर आम्हाला आनंद होईल अशा भावना इला सुचित्रा यांनी व्यक्त केल्या. आम्हाला युरोपियन युनियनमधील कंपन्या शैक्षणिक संस्था यांच्याशी सहकार्य करणे आणि भागिदारी करायला आवडेल असंही त्या म्हणाल्या.


 






भारतातील 1.3 अब्ज लोकांसाठी प्रत्येकी दोन डोस असं 2.6 अब्ज डोस लागतील आणि कोणत्याही एका देशाला एकट्याने इतक्या लसींची निर्मिती करणं शक्य होणार नाही. पण आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाले तर ही गोष्ट शक्य आहे असं इला सुचित्रा म्हणाल्या. 


अमेरिकेने नुकतंच कोरोना लसीकरणाच्या स्वामित्वाचे अधिकार खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा आता भारतासारख्या राष्ट्रांना होणार आहे.


महत्वाच्या बातम्या :