iNCOVACC Intra-Nasal Covid Vaccine: भारत बायोटेक (Bharat Biotech) इंटरनॅशनल लिमिटेडनं (Bharat Biotech International Limited) सोमवारी (28 नोव्हेंबर) इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकातून दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी दिली आहे. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस बनली आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असं म्हटलं जातं.


कंपनीनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापरासाठी असलेल्या सर्व प्रौढांसाठी या लशीचे दोन्ही डोस प्रायमरी सीरिज आणि हेट्रोलगससाठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ भारतात 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत या लशीचा डोस दिला जाऊ शकतो. 






भारत बायोटेकनं निवेदनात काय म्हटलंय? 


भारत बायोटेकनं दिलेल्या माहितीनुसार, स्टोरेज आणि वितरणासाठी iNCOVACC दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे.


कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, लशीची तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. तसेच, ही लस घेणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच, यशस्वी परिणामांनंतर ही लस नाकावाटे देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. निवेदनानुसार, या लशीच्या प्रोडक्ट डेवलपमेंट आणि क्लिनिकल ट्रायलसाठी अंशतः भारत सरकारकडून निधी देण्यात आला होता.


भारत बायोटेकचे अध्यक्ष 'इन्कोव्हॅक'बाबत म्हणतात... 


भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला म्हणाले की, "iNCOVACC ही प्राथमिक 2-डोस शेड्यूल आणि हेटरोलॉगस बूस्टर डोससाठी इंट्रानेसल लस आहे. ही लस म्हणजे, आपण आणि जागतिक वैज्ञानिक समुदायाचं एक मोठं यश आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "कोविड लशीची मागणी कमी होऊनही, आम्ही भविष्यातील संसर्गजन्य रोगांसाठी प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानासह चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी इंट्रानासल लसींमध्ये उत्पादन विकास सुरू ठेवला आहे."