Bharat Band Breaking News LIVE Updates : आज भारत बंदची हाक, राज्यासह देशभरातील अपडेट एका क्लिकवर...

Bharat Bandh Live Updates : रस्ते, वाहतूक आणि उर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बंदशी संबंधित प्रत्येक क्षणाच्या अपडेट्ससाठी एबीपी माझाला फॉलो करा..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Mar 2022 02:36 PM

पार्श्वभूमी

Bharat Bandh 2022 : आज आणि उद्या भारत बंदची हाक देण्यात आली असून याचा परिणाम बँकिंग आणि वाहतुकीसह विविध सेवांवर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी...More

संपाच्या दुसऱ्या दिवशी महावितरणच्या कल्याण झोन मधील दीड हजार कर्मचारी संपात सहभागी

महावितरणच्या कामगार संघटनाकडुन महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या खासगीकरण व विभाजनाला विरोध करत दोन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण मधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. कल्याण झोन मधील तब्बल दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत .आज दुसऱ्या दिवशी देखील महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या तिन्ही कंपन्यांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला. दरम्यान उपलब्ध कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या  मदतीने कामकाज सुरू असल्याने वीज पुरवठा सेवा सुरळीत असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले .