A Lamborghini car crushed several laborers : नोएडामध्ये एका लॅम्बोर्गिनी कारने फूटपाथवर बसलेल्या अनेक मजुरांना चिरडले. यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला. जेव्हा लोक गाडीजवळ धावत आले तेव्हा ड्रायव्हरने विचारत म्हणाला की, कोणी मेलं आहे का? मग तो हळूच गाडीतून बाहेर आला. म्हणाला की, मी हलकी रेस केली होती, गाडी अचानक पुढे जाऊ लागली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कामगारांना रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी चालकाला अटक केली असून कार जप्त केली आहे. गाडी दुसऱ्याची होती, तरुण टेस्ट ड्राईव्हसाठी बाहेर गेला होता.
कोणी मेले आहे का? हे ऐकून लोक संतापले
सेक्टर-126 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 94 मधील चरखा फेरीजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की जेव्हा लोक आरोपी कार ड्रायव्हरकडे जातात तेव्हा तो कारमधून विचारतो, कोणी मेले आहे का? हे ऐकून लोक संतापले.
कामगार फूटपाथवर बसले होते
रविदास आणि रंभू कुमार हे दोन मजूर चरखा फेरीजवळील फूटपाथवर बसले होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेली लॅम्बोर्गिनी त्यांच्या अंगावर धावून फूटपाथवर चढली आणि झाडाला धडकली. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या दीपक कुमारला अटक केली आहे. तो अजमेरचा रहिवासी आहे. त्याने सांगितले की कार त्याची नाही. कारचा मालक मृदुल हा सुपरनोव्हा येथील रहिवासी आहे.
आरोपी हा कार दलाल
दीपकने सांगितले की, त्याने गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी घेतली होती. तो दलाल म्हणून काम करतो. तो लक्झरी कार खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करणारा आहे. ते तपासण्यासाठी तो गाडी चालवत होता. गाडीच्या स्क्रीनवर काही त्रुटी दिसत होत्या, जी तपासण्यासाठी तो चालवत होता. त्यानंतर हा अपघात झाला.
इतर महत्वाच्या बातम्या