इंदूर: भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटबाबत मध्य प्रदेशचे पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी मोठा दावा केला आहे.

माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर हा उल्लेख असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

मात्र भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न आहे.

भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!  

कोण आहे विनायक?

विनायक हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे

विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे

भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे

विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.

विनायक काल भय्यू महाराजांच्या मुलीला आणण्यासाठी पुण्याला गेला होता, त्यादरम्यान भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची माहिती - सूत्र

भय्यू महाराज यांची संपत्ती

भय्यू महाराजांच्या संस्थेचे राज्य सचिव उस्मानाबादचे आहेत. त्यांच्याकडून घेतलेली माहितीची अधिकृत संपत्ती याप्रमाणे -

गेल्या काही वर्षांमध्ये भय्यू महाराजांनी एकूण मिळून १२०० एकर शेती विकली. आता भय्यू महाराजांकडे फक्त ८० एकर शेती शिल्लक आहे.

खामगाव जिल्हा बुलढाणा इथली शंभर एकर शेती विकली त्यातून एक कोटी ऐंशी लाख मिळाले.

त्याआधी बार्शी टाकळी जिल्हा अकोला इथली ८० एकर शेती विकली.

तुळजापूर शहरांमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यासाठी पाच एकर जमीन विकून बावीस लाख रुपये दिले.

सध्या सुजालपूर मध्यप्रदेश इथे ८० एकर शेती शिल्लक.

महाराष्ट्रात सध्या बुलडाण्यात पारधी समाजाच्या मुलांसाठीच्या दोन आश्रमशाळा आहेत अनुदानित इथं दीड हजार विद्यार्थी शिकतात.

पुणे आणि अकोला इथे यांचाही ग्रस्त मुलांसाठी विनाअनुदानित आश्रम आहे. शाळा आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या एकतपूर इथं पाचवी ते बारावी महाविद्यालय आहे साडेतीनशे मुले शिकतात. विनाअनुदानित.

तुळजापूर तालुक्यातल्या मुरता इथं पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी शाळा आहे विनाअनुदानीत साडेतीनशे मुले शिकतात.

संस्थेला ८० सी मध्ये देणगी मिळाल्यानंतर कर सवलत होती. त्यातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत.

अधिकृतपणे संस्थेच्या ऑडिटनुसार दरवर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल होती.

संबंधित बातम्या 

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं  

 मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली! 

भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!  

हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट   

नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?