कोहलीचं चॅलेंज मोदींकडून पूर्ण, आता मोदींचं चॅलेंज....
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2018 11:20 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. विराट कोहलीनं केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदींना आव्हान दिलं होतं. ते त्यांनी पूर्ण केलं. पंतप्रधान मोदींनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई करणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्राला फिटनेस चँलेज दिलं आहे. याशिवाय चाळीसी पार केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनाही मोदींनी फिटनेस चॅलेंज दिलं आहे.