... अन् भागवत कराड यांच्यातील डॉक्टर जागा झाला, कार्यक्रम सोडून चक्कर आलेल्या कॅमेरामनवर केले उपचार
Bhagwat Karad : प्रोटोकॉल बाजूला ठेवत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी एका कॅमेरामॅनचा जीव वाचवलाय...
Bhagwat Karad : भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड हे फक्त नावालाचा डॉक्टर नाहीत तर मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरही त्यांच्यातील डॉक्टर अजूनही जिवंत असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एका कार्यक्रमात डॉक्टर असलेल्या भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत एका कॅमेरामनचे प्राण वाचवले आहेत.
भागवत कराड हे 16 जूनला आज एका कार्यक्रमाला गेले होते. या वेळी कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी आलेला कॅमेरामॅन बेशुद्ध झाला आणि खाली कोसळला. त्यानंतक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी भागवत कराड यांनी पाहिले असता एका व्यक्तीची प्रकृती खालावल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत आणि क्षणाचाही विलंब न करता या कॅमेरामनच्या मदतीला धाव घेतली. घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हारयल होत आहे. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता भागवत कराडांमधील डॉक्टर जागा झाला आणि ताबडतोब प्रथमोपचार केली. भागवत कराडांच्या कृतीचे कौतुक होत आहे.
Finance minister @DrBhagwatKarad once again set an example for humanity, he came for @SudarshanNewsTV conclave, a photographer fell unconscious, he immediately gave first aid and saved his life.once he saved a air passenger's life @narendramodi @SureshChavhanke @mukeshkrd pic.twitter.com/ab1ITabjRK
— Roshan Gaur रोशन गौड़ (@roshangaur) June 16, 2022
या अगोदर देखील विमानात एका प्रवाशाला अस्वस्थ वाटल्यानंतर ही भागवत कराड यांनी आपलं डॉक्टरी कौशल्य दाखवत तातडीची मदत केली होती. यानंतर डॉ. भागवत कराड यांचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. भागवत कराड यांच्याकडे मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्रिपद देण्यात आलेय. केंद्रीय मंत्री असलेले भागवत कराड पेशानं एक डॉक्टर आहेत.