एक्स्प्लोर

उत्तम सौदेबाजी, मोठ्या प्रमाणावर व्यापार... ; पंतप्रधानांनी दिली FPO च्या 5 वैशिष्ट्यांची यादी

Powers of FPOs : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी FPO च्या 5 वैशिष्ट्यांची यादी सांगितली.

Powers of FPOs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत आर्थिक फायद्यांचा 10वी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर त्यांच्या भाषणात शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) च्या पाच वैशिष्ट्यांची यादी केली.

PM मोदी म्हणाले की, भारतातील "लहान शेतकऱ्यांची वाढती क्षमता" एकत्रित करण्यात FPOs ची मोठी भूमिका आहे. ते पुढे म्हणाले, "छोटे शेतकरी जे पूर्वी एकटे राहत असत, त्यांच्याकडे आता एफपीओच्या रूपानं मोठे अधिकार आले आहेत."

 

पंतप्रधान मोदींनी सूचीबद्ध केलेल्या पाच शक्तींची यादी :

  • अधिक चांगल्या सौदेबाजीच्या संधी, ज्याला पीएम मोदींनी "बार्गेनिंग पॉवर" असं संबोधलं 
  • मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्याची संधी.
  • व्यवसायाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग वापरणं आणि समाविष्ट करणं
  • पीएम मोदी म्हणाले की, चौथी शक्ती म्हणजे जोखीम व्यवस्थापन (Risk Management). "एकत्रितपणे, तुम्ही (शेतकरी) आव्हानांचे अधिक चांगल्या प्रकारे मूल्यांकन करू शकता आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी मार्ग तयार करू शकता," असं मोदींनी स्पष्ट केलं होतं. 
  • पंतप्रधानांच्या मते, FPOs ची पाचवी शक्ती विकसित होत असलेल्या बाजाराच्या ट्रेंडनुसार बदलण्याची क्षमता आहे.

PM-KISAN योजनेअंतर्गत, देशभरातील 10 कोटी लाभार्थी कुटुंबांना 20,000 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एका कार्यक्रमात 10 वा हप्ता जारी केला. पात्र शेतकरी कुटुंबांना योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. जो 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिला जात असतो. पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. 

PM-KISAN योजना फेब्रुवारी 2019 मध्ये जाहीर करण्यात आली होती आणि नवीनतम हप्त्यांसह, योजनेअंतर्गत प्रदान केलेली रक्कम जवळपास 1.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

पीएम-किसान योजनेंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच, पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे, 1 जानेवारीला देण्यात येणार आहे. 1 जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.
1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in  भेट द्या. 
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. 
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता. 

काय आहे पीएम किसान योजना? 
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PM Kisan : नववर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित; 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित होणार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Chandrakant Patil On Fees Regulating Authority ACT: सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
Kaziranga Accident: आसामच्या काझीरंगा महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा दुर्दैवी अंत; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांची मदत जाहीर
आसामच्या काझीरंगा महामार्गावर भीषण अपघात, 26 जणांचा दुर्दैवी अंत; पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाख रुपयांची मदत जाहीर

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget