नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ( Vice President Election Result ) एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar New Vice President) ) यांचा विजय झाला आहे.  जगदीप धनखड यांच्या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशभरातील नेत्यांनी त्यांना नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 


उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने जगदीप धनखड हे राज्यघटनेचे आदर्श संरक्षक सिद्ध होतील असा विश्वास आहे. या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली  धनखड यांना पाठिंबा दिल्याबद्दल मी NDA चे सहयोगी, इतर पक्ष आणि संसद सदस्यांचे आभार मानतो, असे ट्विट गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. 






जगदीप धनखड यांची भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन. मार्गारेट अल्वा यांनी सन्मानाने संयुक्त विरोधी पक्षाच्या भावनेचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल त्यांचे आभार,  असे ट्विट राहुल गांधी यांनी केलय. 






जगदीप धनखड यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात तुम्हाला यश मिळो या शुभेच्छा, असे ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.