नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ( Vice President Election Result ) जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar New Vice President) ) यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनकड यांना 528   टक्के मतं तर मार्गारेट अल्वा  यांना  182  मतं मिळाली आहेत. 


जगदीप धनखड 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती ची शपथ घेतील. देशाचे   सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतोय. समाप्त होणार आहे. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहतीनुसार. धनखड यांना 725 मतांपैकी 528 मते मिळाली. 346 मतांनी त्यांचा  विजय झाला आहे. तर 15 मते अवैध ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली. उपराष्ट्रपतीपदासाठी 92.94 टक्के मतदान झाले आहे.  






उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 725 खासदारांनी मतदान केले आहे. टीएमसीच्या 34, भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन आणि बीएसपीच्या एका खासदाराने मतदान केले नाही.  सनी देओल विदेशात आणि संजय धोत्रे हॉस्पिटलमध्ये असल्यानं मतदान केले नाही. शिवसेनेकडून अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, राजन विचारे हे देखील मतदानासाठी अनुपस्थित होते. 


जगदीप धनखड हे 71 वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजातील आहेत. त्यांची पार्श्वभूमी समाजवादी आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, तर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एकाच राज्याचे असतील, हा योगायोग म्हणावा लागेल. सध्या ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात. 


संबंधित बातम्या :


Vice President Election 2022 : भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? किती जणांनी भुषावले पद?