एक्स्प्लोर

आधारची सुरक्षा धोक्यात, साडे 13 कोटी नागरिकांचा डेटा लीक?

नवी दिल्ली : बंगळुरुच्या सेंटर फॉर इंटरनेट अॅन्ड सोसायटी (CIS) च्या एका अहवालानंतर आधार कार्डच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण सीआयएसने तब्बल साडे 13 कोटी नागरिकांचे आधार कार्डचे डिटेल लीक झाल्याचा दावा केला आहे. या अहवालानुसार सर्वाधिक डेटा हा ग्रामीण विकास मंत्रालयाशी संबंधित विभागातून लीक झाला आहे. यामध्ये राष्ट्रीय सामाजिक मूल्यांक कार्यक्रम (national social assessment programme) चा डॅशबोर्ड आणि राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याच्या पोर्टलवरुन आधारची माहिती लीक झाली आहे. विशेष म्हणजे, यातील दोन डेटा बेस हे आंध्र प्रदेशमधील असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच एका राज्यातील मनरेगाचं पोर्टल आणि चंद्रना विमा योजना नावाच्या शासकीय वेब पोर्टलच्या डॅशबोर्डचाही यात समावेश आहे. यामध्ये दोन्ही पोर्टलवर लाखो नागरिकांचे आधार कार्डचे डिटेल आहेत. हे डॅशबोर्ड सार्वजनिक केल्याने ते कोणीही पाहू शकतं. अहवालात नमुद केलेल्या चार डेटा बेसवरुन लीक झालेले आधार नंबर 13 ते साडे 13 कोटीच्या दरम्यान आहेत. यात अकाऊंट नंबर 10 कोटीच्या जवळपास असावेत. तर एनएसएपीच्या पोर्टलवरील आधार कार्डसंबंधित 94.32 लाखापेक्षा अधिक बँक खाती आणि 14.98 लाख पोस्ट खात्यांची माहिती आहे, असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे आधार डिटेल सीएससी या कंपनीने लीक केले होते. याची तक्रार धोनीची पत्नी साक्षीने ट्वीट करुन सरकारकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन सरकारने सीएससीला 10 वर्षांसाठी बंदी घातली. सध्या देशातील 115 कोटीपेक्षा जास्त नागरिकांकडे आधार कार्ड आहे. यासाठी UIDAI  सिस्टीममध्ये आधार बनवणाऱ्या नागरिकांचा डेटा सेंट्रल रिपॉजिटरीवर स्टोर होतो. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतील डेटा सुरक्षित ठेवणे UIDAI समोर आव्हान आहे. पण UIDAI आपल्या तंत्रज्ञनात कोणत्याही त्रुटी नसल्याचं पूर्वीच स्पष्ट केलं आहे. जून महिन्यापासून याच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात येणार असून, ही सुरक्षितता तीन स्तरावर असेल असं UIDAI नं स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या

धोनीच्या 'आधार'ची माहिती लीक, साक्षीचा रवीशंकर प्रसाद यांच्यावर निशाणा

सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड सक्तीचं

रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतींसाठी आधार कार्ड सक्तीचं?

विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आधार क्रमांक आधारित ओळखपत्र अनिवार्य

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक

आधार पेमेंट अॅप : अंगठा दाखवा; पेमेंट करा

परीक्षेला बसताय, आधी आधार कार्ड दाखवा!

आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप

‘या’ 15 कामांसाठी यापुढे आधार कार्ड अनिवार्य!

लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget