एक्स्प्लोर

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना 'तो' गिटार वाजवत होता!

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन टेबलवर रुग्ण चक्क गिटार वाजवत होता.

बंगळुरु : मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन टेबलवर रुग्ण चक्क गिटार वाजवत होता. ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरुच्या भगवान महावीर जैन हॉस्पिटलमधील  आहे. 37 वर्षीय अभिषेक प्रसाद या तरुणाल 'म्युझिशियन्स डिस्टोनिया' हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं होतं. यामुळे त्याच्या डाव्या हाताची तीन बोटं बधीर झाली होती. वाद्य वाजवणाऱ्या रुग्णाच्या स्नायूंची हालचाल अतिप्रमाणात झाल्याने म्युझिशियन्स डिस्टोनिया हा आजार होतो. मूळचा बिहारचा असलेल्या अभिषेकवर जवळपास सात तास अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान अभिषेक पूर्णत: शुद्धीवर होता. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया सुरु असतानाच तो चक्क गिटार वाजवत होता. दीड वर्षांपूर्वी गिटार वाजवतानाच पहिल्यांदा स्नायू बधीर झाल्याचं अभिषेकच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मेंदूमध्ये बिघाड झालेला भाग शोधून काढण्यासाठी 'रिअलटाईम फीडबॅक' मिळणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याने गिटार वाजवण्याची आम्हाला मदत झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं. या शस्त्रक्रियेदरम्यान, मेंदूचा काही भाग जाळून नष्ट केला. शस्त्रक्रियेआधी तरुणाच्या कवटीमध्ये चार स्क्रू घुसवून डोक्‍याभोवती एक फ्रेम निश्‍चित करण्यात आली. यानंतर एमआरआय स्कॅननंतर कवटीला 14 एमएम खोल भोक पाडण्यात आलं. यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला," असं या रुग्णालयातील मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शरण श्रीनिवासन यांनी सांगितलं. दरम्यान, शस्त्रक्रियेनेतर माझ्या बोटांमधील बधीरपणा 100% नष्ट झाला आहे. या शस्त्रक्रियेनंतर तीनच दिवसांत मला डिस्चार्ज मिळाला आणि आता मी गिटार वाजवण्यास तयार आहे," अशी प्रतिक्रिया अभिषेकने दिली. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget