बेळगाव: कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर होत आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल.

निवडणुका असो किंवा काहीही कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमाप्रश्न नेहमीच उफाळलेला असतो.

बेळगाव, बिदर, भालकीसह 865 गावांना महाराष्ट्रात यायचं आहे. त्यासाठी तब्बल 62 वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सुरु आहे. एक अवलिया असा आहे, जो सीमाप्रश्न सोडवण्यासाठी 35 वर्षांपासून अनवाणी फिरत आहे.

35 वर्षांपासून अनवाणी

मधुकर कणबुर्गी, वय फक्त ६८ वर्ष,व्यवसाय कापडी पिशव्या विकण्याचा..पण या चेहऱ्यानं इंदिरा गांधी,राजीव गांधी आणि मोरारजींनाही घाम फोडला होता.कारण एकच बेळगाव,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

तुम्ही म्हणाल यात विशेष ते काय?.

35 वर्षापूर्वी चौकात सभा झाली. तिथं मधुकर कणबुर्गींनी जोरदार भाषण ठोकलं आणि जोवर सीमाप्रश्न सुटत नाही तोवर पायात चप्पल घालणार नाही अशी घोषणा केली.

त्यामुळे आता ऊन,वारा,पावसात हा माणूस अनवाणी पायानं फिरस्ती करतो.

निवडणुकीच्या तोंडावर बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये फूट!




सीमाप्रश्न हाच उद्योग, कार्यकर्ते हाच परिवार

मधुकर कणबुर्गींचं घर बेळगावातील टीचर्स कॉलनीत आहे. एकत्र परिवार, दोन भाऊ आणि त्यांचं कुटुंबं असा मोठा कबिला. पण मधुकर कणबुर्गींसाठी सीमाप्रश्न हाच उद्योग आणि कार्यकर्ते हाच परिवार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीतली फूट त्यांना वेदना देते.



मधुकर कणबुर्गींनी आयुष्यभर सीमालढ्यासाठी काम केलं. छोटेमोठे व्यवसाय करुन घराला हातभार लावला. पण सीमालढ्यात असल्यानं कुटुंबालाही बरंच सोसावं लागलं.

सर्वेक्षण : कर्नाटकात कमळ फुलणार?


पोलिसांनी मधुकर कणबुर्गींना कसा त्रास दिला, याची करुण कहाणी कुटुंबातील व्यक्ती सांगतात.


कणबुर्गी परिवार आजही निष्ठेनं महाराष्ट्र एकीकरण समितीचं काम करतो. पुढच्या पिढीतही महाराष्ट्राविषयी ममत्व, ओढ आहे. त्यामुळे आजही त्यांना एकीकरण समितीतला वाद मिटेल अशी आशा आहे.

सीमाभाग महाराष्ट्रात जावा यासाठी अनेकांनी जीवाची बाजी लावली. कित्येक जणांनी तुरुंगवास भोगला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या. पण राजकीय पेचात सीमाभागातील मराठी माणूस भरडला गेला. कदाचित सीमेच्या त्या बाजूला असणाऱ्यांना ती वेदना जाणवत नाही, पण इथं ही जखम अजूनही भळभळत आहे,ताजी आहे.

संबंधित बातम्या

कर्नाटक निवडणूक: शिवकुमार 600 कोटी, येडियुरप्पांची संपत्ती....