एक्स्प्लोर
भूसंपादनाला विरोधासाठी घरासमोर फास लटकवले!
सध्या भूसंपादनाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे.

बेळगाव : सुपिक शेतजमिनीचे संपादन केले तर काय करायचे, ही काळजी कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांना पडली आहे. त्यामुळे या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घराच्या दर्शनी भागातच चक्क फास तयार करुन लावले आहेत. रामा डसका, इराप्पा अष्टेकर, पुंडलिक अष्टेकर अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. बेळगावला लागूनच असलेल्या कणबर्गी गावच्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अलीकडेच बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे आमदार फिरोज सेठ यांनी स्वीकारल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया गतीमान झाली आहे. सध्या भूसंपादनाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. भूसंपादनाला विरोध करण्यासाठी कणबर्गी येथे 9 तारखेला आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















