एक्स्प्लोर

पर्रिकरांच्या गोव्यात उद्यापासून कायदेशीर बीफ विक्री

तीन दिवस बीफ विक्री बंद राहिल्याने 1 कोटी 87 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. पुन्हा बंद ठेवलेले शटर उद्या उघडले जाईल.

पणजी : बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून वारंवार होणाऱ्या तपासाला कंटाळून येथील कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपास सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी  कायदेशीररीत्या बीफ आणून विक्री करण्यास संघटनेला सांगितल्यामुळे बुधवारपासून बीफ विक्री सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मुन्ना बेपारी यांनी सांगितले. बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून वारंवार होणाऱ्या तपासाला कंटाळून येथील कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपास सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे. तीन दिवस राज्यातील बीफ विक्री न झाल्याने सुमारे पावणे दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी  कायदेशीररीत्या बीफ आणून विक्री करण्यास संघटनेला सांगितल्यामुळे उद्या, बुधवारपासून बीफ विक्री सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मुन्ना बेपारी यांनी सांगितले. बेपारी म्हणाले की, आम्ही बेकायदेशीर बीफ विक्रीच्या विरोधात आहोत. गोव्यात येणारे बीफ पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनीच तपासावे. बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्था बीफ तपासू नये, त्यांना कोठे बीफ बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळत असेल, तर त्यांनी ते सरकारच्या पशुसंवर्धन खात्याच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी आम्ही आमची कैफियत मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती. त्यांनी कायदेशीर बीफ विक्रीला सरकारची अजिबात हरकत नसल्याचे सांगितले आहे. आम्ही कर्नाटकातून कायदेशीररित्या बीफ आणण्यास वाहने पाठविली असून, मंगळवारपासून त्याची विक्री सुरू होईल. दरम्यान, तीन दिवस बीफ विक्री बंद राहिल्याने 1 कोटी 87 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. पुन्हा बंद ठेवलेले शटर उद्या उघडले जाईल. त्यामुळे बीफ विक्रीवर अवलंबून असलेले इतर व्यवसायही पूर्ववत सुरू होतील, असे बेपारी म्हणाले. कर्नाटकातून बीफ आणताना आता वाहनमालकाला सर्व कागदपत्रे ठेवावी लागणार आहेत. कारण कायदेशीर कागदपत्रे असल्यानंतर पोलीस कारवाई होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्वत: संघटनेला बजावले आहे. उसगावचा कत्तलखाना सुरू करा ! सरकारने उसगाव येथील कत्तलखान्याचा परवाना लवकरात लवकर नूतनीकरण करावा, म्हणजे येथे कायदेशीर बीफ मिळू शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे. कत्तलखान्याचा परवाना नूतनीकरण हे तांत्रिक अडचणीमुळे लटकले असल्याचे सांगितले जाते, तर सरकारने त्यात लक्ष घालावे आणि ती अडचण दूर करावी, अशी मागणी संघटनेनी केली आहे. काही दिवसांपूर्वी बीफ विक्री बंद झाली होती, तेव्हा उच्च न्यायालयाने सरकारने उसगावचा कत्तलखाना लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. तरीही तो कत्तलखाना सुरू होत नसल्याने येथील बीफ विक्रेत्यांना कर्नाटकातून बीफ आणावे लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget