एक्स्प्लोर

वेतनवाढीसाठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, सलग तीन दिवस बँका बंद राहणार

बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, जर तुमची बँकेतील कामे शिल्लक असतील तर गुरुवारपर्यंत संपवा, अन्यथा हीच कामं उरकण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पाहावी लागेल.

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 1 फेब्रुवारीला पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. पण बँक कर्मचारी संपावर ठाम असल्याने शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.

बँक कर्मचाऱ्यांची 'इंडियन बँक असोसिएशन' सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा फिस्कटल्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (बँक कर्मचारी संघटना) दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.

बँक कर्मचाऱ्यांनी 12.25 टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. ती मागणी सरकारने मान्य न केल्यामुळे ही चर्चा फिस्कटली. या मागणीसह कर्मचाऱ्यांसाठी विशेष भत्ते आणि कायम स्वरूपी पाच दिवसांचा आठवडा (फाईव्ह डे वीक) या मागण्या मांडल्या होत्या. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरणाला बँक कमर्चाऱ्यांचा विरोध आहे.

या संपामुळे बँक ग्राहकांना बँकेशी संबंधित कामं गुरुवारपर्यंत उरकावी लागणार आहेत. अन्यथा त्या ग्राहकांना सोमवारची वाट पाहावी लागेल. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. परंतु तरीदेखील कर्मचारी संपावर असल्याने त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी (शनिवारी )1 फेब्रुवारी रोजी त्या अर्थसंकल्प मांडतील.

दरम्यान, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मार्च महिन्यात पुन्हा एकदा तीन दिवसांचा संप पुकारु असा इशारी बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget