मुंबई: नोटाबंदीच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर केंद्र सरकारनं आता तंबाखूजन्य पदार्थांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण कोणत्याही तंबाखूमिश्रित पदार्थांचे उत्पादन आणि विक्रीवर तातडीनं बंदी घालण्याचे आदेश केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यानं राज्यांना दिले आहेत. इतकंच नाही तर मावा आणि खर्यावरही बंदी घालण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत.
महाराष्ट्रात याआधीच गुटख्यावर बंदी आहे. पण त्यातून पळ काढण्यासाठी पान मसाल्याची पुडी वेगळी आणि तंबाखू पुडी वेगळी अशी विक्री केली जात होती. दरम्यान, या निर्णयामुळे आता अशाप्रकारच्या तंबाखूमिश्रित पदार्थांच्या विक्रीलाही आता लगाम बसणार आहे.