हैदराबादमध्ये इमारत कोसळली, एका महिलेचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2016 07:47 AM (IST)
हैदराबाद: हैदराबादमध्ये एक सातमजली इमारत कोसळल्याची घटना काल घडली. नानक रामगुंडा परिसरात ही इमारत होती. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, एका मुलीला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर आणखी 10 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याची माहिती समजते आहे. सध्या येथे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याबाबत नेमकी माहिती सध्या तरी समजू शकलेली नाही.