Punjab News : देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवर साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे 'आय लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे पंजाबमध्ये सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुपनगरचे एसएसपी अखिल चौधरी यांनी म्हटलं की, पाकिस्तानी ध्वज असलेले फुगे आणि त्यावर लिहिलेले 'आय लव्ह पाकिस्तान' फुगे रूपनगरच्या संदोया गावाच्या शेतात सापडले आहेत.


अखिल चौधरी पुढे म्हणाले की, असे दिसते की फुगे जवळच्या ठिकाणाहून आले आहेत. परंतु आम्ही दुसरा कोन नाकारू शकत नाही. त्यांनी सांगितले की, तपास सुरू करण्यात आला आहे.






स्वातंत्र्यदिनी पंजाबचे मुख्यमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा


आज पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी पाकिस्तानच्या नापाक कटांपासून राज्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि सांगितले की आम्हाला शांतता हवी आहे. पण आमच्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचे आक्रमण किंवा आक्रमकता सहन करणार नाही. पंजाबला कोणताही धोका म्हणजे संपूर्ण देशाला धोका. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात तिरंगा फडकवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केंद्राचे तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांशी लढा सुरू ठेवण्याचा संकल्पही केला.


पाकिस्तानविरोधात पूर्णपणे सतर्क राहण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्हाला शांतता हवी आहे पण आमच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे आक्रमण किंवा आक्रमकता सहन करणार नाही. जर पाकिस्तानने कोणताही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना असा धडा शिकवला जाईल की ते तो आयुष्यभर विसरणार नाहीत, अस इशाराच त्यांनी दिला. 


मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुढे म्हणाले की, पंजाबमध्ये शस्त्र आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानच्या ड्रोनच्या वापरावर अमरिंदर सिंग यांनी इशारा दिला की इस्लामाबाद कोणत्याही राज्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याची संधी सोडणार नाही. सरकार गुंड आणि दहशतवाद्यांसह कोणताही धोका सहन करणार नाही. पंजाबला कोणताही धोका संपूर्ण देशासाठी धोका असेल. 


आमचं सरकार सत्तेवर आल्यापासून 47 पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल आणि गुंडांच्या 347 मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या वेळी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना अमरिंदर सिंग यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू ठेवण्यावर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती. या काळ्या कायद्यांविरोधातील लढा राजकीय नाही, असंही त्यांनी म्हटलं.