एक्स्प्लोर

Ballia Firing Case : बलियात पोलिस अधिकाऱ्यांसमोर गोळीबार, आरोपी फरार, योगी सरकारवर टीकेच्या फैरी

Ballia Firing Case : उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार बलिया गोळीबार कांडामुळं विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहे. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या समोर गोळीबार करत हत्या केल्याची घटना झाल्यानंतर योगी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

बलिया : उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार बलिया गोळीबार कांडामुळं विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहे. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या समोर गोळीबार करत हत्या केल्याची घटना झाल्यानंतर योगी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपी धिरेंद्र सिंह हा अद्याप फरार असून त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे.

बलियातील दुर्जनपूरमध्ये रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि  भाजप कार्यकर्ता धिरेंद्र सिंह याने जयप्रकाश यांची गोळ्या घालून हत्या केली. धिरेंद्र सिंह हा भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहेत, असं म्हटलं आहे. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाच सेकंदाच्या या व्हिडीओत तीन वेळा गोळीबार झाल्यानंतर लोक घाबरुन पळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशासनातील बडे अधिकारी देखील उपस्थित आहेत.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की, एनकांउटरवालं हे सरकार आता आपल्या लोकांची गाडी पलटी करेल का?. तर बसपा अध्यक्षा मायावती यांनी उत्तरप्रदेशातील कायदा व्यवस्था संपुष्टात आली आहे, असं म्हटलंय. तर काँग्रेसनं योगी सरकारव आपल्या लोकांना वाचवत असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात गोळी चालवणारा व्यक्ती भाजपचा नेता असल्याचं बोललं जात आहे. यावरुन सर्व विरोधी पक्षांनी भाजप सरकारला घेरलं आहे.

दरम्यान पोलिसांसमोर हत्या करणारा धिरेंद्र सिंह उर्फ डबलू अद्याप फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 12 टीम बनवल्या आहेत. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी रात्रभर छापामारी केली. घटना घडली त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं होतं मात्र तो काही वेळाने फरार झाला. आता पोलिसांवर आरोप लावला जात आहे की, त्याला जाणून बुझून पळून दिलं गेलं.

आमदार म्हणतात, क्रियेला प्रतिक्रिया येणारच भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, या प्रकरणातील आरोपीला मारहाण केली होती. क्रियेला प्रतिक्रिया ही येणारच, असं सुरेंद्र सिंह यानं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलंय की प्रशासन तिथं पहिल्यापासून उपस्थित होतं. तिथं दुकानांच्या कोट्यासंदर्भात बैठक होती. यावेळी एका पार्टीने सगळी कागदपत्रं दिली होती मात्र दुसरी पार्टी कागदपत्रं देत नव्हती. यामुळं गोंधळ झाला आणि मारहाण सुरु झाल्यानं धांदल उडाली. यात अनेक लोकं जखमी झाले. गोळीबार केलेल्या आरोपीच्या वडिलांना लोकांनी काठ्यांनी मारहाण केली. जर कुणी आपल्या जवळच्या लोकांना मारत असेल तर क्रियेला प्रतिक्रिया येणारच, असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget