NSE Co-Location Case : दिल्लीतील एका न्यायालयाने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण  (Chitra Ramakrishan) आणि समूह संचालन अधिकारी (GOO) आनंद सुब्रमण्यम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज फेटाळताना नोबेल पारितोषिक विजेते बॉब डिलन आणि फ्रँकेनस्टाइन राक्षस यांचा उल्लेख केला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांसह (FIIs) आर्थिक जग राष्ट्रीय शेअर बाजाराला बळकट करण्यासाठी वाट पाहत आहे. जेणेकरुन ते मोठ्या संख्येने भारतात गुंतवणुकीसाठी येऊ शकतील जे सध्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.


विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी 12 मे रोजी दिलेल्या आदेशात ही माहिती दिली. या आदेशाची 42 पानांची तपशीलवार प्रत सोमवारी न्यायालयाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. न्यायालयाने म्हटले की, आरोपी रामकृष्ण या प्राथमिकदृष्ट्या राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रकरणे एका खासगी क्लब'सारखी चालवत होती. गायक-लेखक नोबेल पारितोषिक विजेते बॉब डिलन एकदा म्हणाले होते, मनी डज नॉट टॉक, इट स्वेअर्स.


"इट्स ऑलराईट, आय ऍम ओन्ली ब्लीडिंग" या 1964 च्या गाण्याच्या अल्बममधील हे गाणे आहे, याचा अर्थ केवळ पैशाचा फक्त परिणाम होत नाही, तर त्याचा खूप मोठा प्रभाव असतो आणि त्याचा लोकांवरही विपरीत परिणाम होतो, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. सध्याच्या घोटाळ्याचा देशातील गुंतवणुकीच्या लँडस्केपवरही परिणाम होऊ शकतो. परकीय गुंतवणूकदारांप्रमाणेच ज्यांना नेहमी व्यापारासाठी निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वच्छ स्टॉक एक्सचेंज हवे असते.


न्यायाधीश म्हणाले, " राष्ट्रीय शेअर बाजारातील कामकाजाच्या बाबतीत असे म्हणता येईल की, एखाद्या संस्थेच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की ती स्वतः अडचणीत सापडते. त्या क्षणी तिला एक मार्ग निवडावा लागत असतो.    एक असा मार्ग ज्याने गोष्टींवर ताण देण्याऐवजी, जुने वैभव परत मिळवता येईल.


काय आहे प्रकरण ?


चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. 


केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने को-लोकेशन फॅसिलिटी प्रकरणात दिल्लीस्थित OPG सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि प्रवर्तक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध स्टॉक मार्केटच्या बातम्यांपर्यंत लवकर प्रवेश मिळवून नफा मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय त्याच प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि एनएसई, मुंबईचे अज्ञात अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींची चौकशी करत होते.


सेबीने  NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.