नवी दिल्ली: आम्ही आता केवळ कोरोनासंदर्भात क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा डेटा देशासमोर ठेवला तर देशात एक वादळ आलं. ड्रग माफिया, मल्टिनॅशनल कंपनी माफिया, भारतीय आणि भारतीयता विरोधी शक्तींना यामुळं हादरा बसला, असल्याचं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. कोरोनावरील कोरोनिल औषधाचा दावा केल्यानंतर सुरु झालेल्या वादावर आज रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.


रामदवे बाबा म्हणाले की,"असं वाटतंय की भारतात योग, आयुर्वेदावर काम करने अपराध आहे. आमच्याविरोधात शेकडो ठिकाणी एफआरआय दाखल झाल्या. जसं काही आम्ही देशद्रोही आणि दहशतवाद्यांविरोधात दाखल होतात. आम्ही कोरोनावर औषधासाठी एक चांगलं पाऊल उचललं. मात्र लोकं आम्हाला शिव्या देऊ लागले. तुम्ही आम्हाला शिव्या द्या, मात्र कमीत कमी त्या लोकांप्रती तरी सहानुभूति दाखवा जे लोकं कोरोना व्हायरस पीडित आहेत आणि ज्या लाखो लोकांवर पतंजलीने उपचार केला आहे."

लायसेंसवर रामदेव बाबा म्हणतात...

रामदेव बाबा म्हणाले की, आयुर्वेद औषधं बनवण्याचं यूनानी आणि आयुर्वेद विभागाचं लायसन्स आम्ही घेतलं आहे. कोरोनिल औषधाच्या प्रयोगासाठी ज्यांची परवानगी घ्यायची होती, त्या सर्वांचे प्रमाणमंत्र आम्ही आयुष मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहेत”, असं रामदेव बाबा म्हणाले. ते म्हणाले आयुर्वेदातील सर्व औषधांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या परंपरागत गुणांच्या आधारवर होतं. ते म्हणाले कोरोनिल औषधासंदर्भात सर्व रिसर्च आयुष मंत्रालयाला दिला आहे, ज्यांना पाहायचा आहे, ते पाहू शकतात. आम्ही मॉडर्न सायंसच्या प्रोटोकॉलमुसार रिसर्च केला आहे.

हेही वाचा- पतंजलीचा यू-टर्न! आम्ही कोरोनावर उपचारासाठी औषध बनवलं नाही : आचार्य बालकृष्ण

कोरोनाविरोधाच्या लढाईत पतंजलीने जे काम केलं त्याची स्तुती करावी, असा माझा आग्रह नाही. आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही. मात्र, तिरस्कार तरी करु नका, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले आहेत. पतंजलीने केलेल्या प्रयत्नात तीन दिवसात 69 टक्के आणि सात दिवसात शंभर टक्के रुग्ण बरे झाले. त्याची सविस्तर माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे”, असं स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिलं.

बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील 'कोरोनिल' हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. त्यानंतर अनेक या औषधावरून अनेक वाद निर्माण झाले होते. अशातच पतंजली योग पिठाने आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल हे औषध उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असल्याचं पतंजलीकडून सांगण्यात आलं आहे.

पतंजलीचा दावा काय होता?

23 जून रोजी पतंजलीचे योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रामदेव बाबा म्हणाले की, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.


संबंधित बातम्या : 

पतंजलीकडून कोरोनावरील औषध 'कोरोनिल' लॉन्च, Covid 19 वर प्रभावी असल्याचा दावा

कोरोना संसर्गावरील औषधावरुन पतंजली नव्या वादात, कोरोना किट लाँच करेपर्यंत आयुष मंत्रालयाला माहिती नसल्याचं स्पष्ट