एर्नाकुलम (केरळ) : केरळ पोलिसांनी 14 जानेवारी रोजी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील पीजी मनूविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्याच्यावर बलात्कार पीडितेवरच बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीजी मनू सध्या फरार आहे. उच्च न्यायालयाने मनूला आत्मसमर्पण करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. हे प्रकरण ऑक्टोबर 2023 मधील आहे. 25 वर्षीय बलात्कार पीडित मुलगी 2018 मध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मनूकडे गेली होती. यानंतर मनूने महिलेवर तीन वेळा बलात्कार केला आणि अश्लील छायाचित्रेही काढली. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर आरोपी देशाबाहेर पळून जाऊ शकत नाही. त्याला विमानतळावर किंवा पोर्टवर दिसता क्षणी अटक केली जाते.


आई-वडील बाहेर थांबले, आत बलात्कार झाला


तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, 9 ऑक्टोबर रोजी ती महिला तिच्या आई-वडिलांसोबत कडवंथरा कार्यालयात गेली असताना आरोपीने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मनूने महिलेच्या पालकांना बाहेर थांबण्यास सांगितले आणि पीडितेशी चर्चा करण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद केला आणि खोलीत तिच्यावर बलात्कार केला.


केस उलथवून टाकण्याची धमकी दिली


पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने वकिलाच्या या कृतीला विरोध केला तेव्हा त्याने 2018 चा खटला उलटवून तिला आरोपी बनवण्याची धमकी दिली. वकिलाने 11 ऑक्टोबरला पुन्हा महिलेला बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. तो व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅटच्या माध्यमातून अश्लील बोलत असे, असे महिलेने सांगितले. 24 नोव्हेंबर रोजी पीडितेच्या घरी कोणी नसताना वकिलाने बळजबरीने तिच्या घरात घुसून तिसर्‍यांदा बलात्कार केला.


एर्नाकुलम ग्रामीण एसपींना दिलेल्या तक्रारीत महिलेने बलात्कारासोबतच तिचे अश्लील फोटोही काढल्याचे सांगितले. आयपीसी कलम 376 अंतर्गत लैंगिक छळ व्यतिरिक्त पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या