Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार असून त्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करणारे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Swami Avimukteshwaranand) यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलंय. आम्ही मोदीविरोधी नाही, तर त्यांचे प्रशंकस असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. 


शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदूंना आत्मजागरूक केले आहे आणि ही छोटी गोष्ट नाही. आम्ही अनेक वेळा जाहीरपणे सांगितले आहे की आम्ही मोदीविरोधी नाही तर त्यांचे प्रशंसक आहोत. मला सांगा याआधी मोदींसारखे हिंदूंना कोणी बळकट केले? आमचे अनेक पंतप्रधान झाले आहेत आणि ते सर्व चांगले आहेत, आम्ही कोणावरही टीका करत नाही."


पंतप्रधान मोदी हिंदूंना बळकट करण्यासाठी काम करत आहेत


शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, "जेव्हा कलम 370 रद्द करण्यात आले, तेव्हा आम्ही त्याचे स्वागत केले नाही का? नागरिकत्व सुधारणा कायदा आला तेव्हा आम्ही त्याचे कौतुक केले नाही का? पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता मोहिमेत आम्ही अडथळे आणले का? राम मंदिर बांधण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कायदा आणि सुव्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, याचेही आम्ही कौतुक केले."


शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "जेव्हा हिंदू बलवान होतात, तेव्हा आम्हाला आनंद वाटतो आणि नरेंद्र मोदी ते काम करत आहेत."


शंकराचार्यांनी राम मंदिराच्या मुहूर्तावर प्रश्न उपस्थित केला होता


यापूर्वी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी शंकराचार्यांनी वेगवेगळी कारणे सांगून राम मंदिराचे उद्घाटन टाळले होते.  मंदिर अद्याप पूर्णपणे तयार नाही आणि त्यापूर्वी अभिषेक करू नये, अपूर्ण मंदिरात देवाचा अभिषेक शास्त्रात निषिद्ध आहे.


अयोध्यानगरी सजली


प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा तो क्षण अवघ्या काही क्षणांमध्ये पार पडणार आहे. याचपार्श्वभूमीवर अयोध्या नगरी सज्ज झाली, मंदिरामध्ये गेले अनेक दिवस वेदपठण, जपानुष्ठान सुरु आहे. अवघं वातावरण चैतन्यमय झालं आहे. घनपाठ, होमहवन, देवअधिवास, चार वेदांचं पठण, पुण्याहवाचन असे सात्विक आणि धार्मिक कार्यक्रम मंत्रोच्चारात, रामनामात मंगलमयरित्या संपन्न होत आहेत. 


मंदिर सजून गेलं आहे, शिखर असेल, घुमट असेल, प्रत्येक खांब असेल सगळीकडे फुलापानांची आरास दिसते आहे, रांगोळ्यांनी रस्ते सजले आहेत तर दुसरीकडे पूजेसाठी बसणारे यजमान असोत की पूजा सांगणे पुरोहित सारेजण रामकार्यात गुंग होऊन गेले आहेत. साऱ्यांना आता आस एकच लागली आहे ती म्हणजे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची. 


ही बातमी वाचा: