एक्स्प्लोर

राम मंदिर आंदोलन पुन्हा सुरु होण्याची शक्यता, 5 ऑक्टोबरला 'विहिंप'ची बैठक

सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने देशभरातील 36 संतांची बैठक बोलावली आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीचं आंदोलन पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) 5 ऑक्टोबर रोजी देशतील 36 संतांची बैठक बोलावली आहे. या संतांची समिती 5 ऑक्टोबरला राम मंदिर निर्मितीसाठी कार सेवकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या समितीचे प्रमुख राम मंदिर आंदोलनाचे मुख्य महंत नृत्य गोपाल दास आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विहिंपने सर्व संतांना पत्र जारी केलं असून राम मंदिराबाबत निर्णय घेण्यासाठी निमंत्रण पाठवलं आहे. याच बैठकीत राम मंदिर निर्मितीसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. या विषयावर अध्यादेश जारी करण्याबाबत विचार करायला हवा, असं ते म्हणाले होते. राम जन्मभूमीवर राम मंदिर लवकरात लवकर उभं रहायला हवं. हा प्रश्न अजून लांबू नये, असं ते म्हणाले होते. अयोध्या वादातील दोन्ही पक्षांनी या प्रश्नावर सहमतीने तोडगा शोधल्याचा दावा 16 सप्टेंबरला राम जन्मभूमी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राम विलास वेदांती यांनी केला होता. काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या माध्यमातून तोडगा निघाल्याचं ते म्हणाले होते. याअंतर्गत लखनौमध्ये जगातील सर्वात मोठी मशिद बांधली जाईल. तर अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जाईल. मशिद बाबरच्या नावावर नसेल, असंही ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget