Ayodhya Mandir Ram Sita Idols : अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य-दिव्य अशा राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यात येत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. 2024 पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. राम मंदिरांच्या गर्भगृहामध्ये प्रभू राम आणि सीता मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. प्रभू राम आणि सीत मातेची मूर्ती कोणत्या दगडापासून तयार करायची हा प्रश्न होता. मात्र, आता राम आणि सीतेच्या पवित्रा मूर्तीसाठीच्या दगडाचा शोध पूर्ण झाला आहे. या कामासाठी एक पथक गेल्या अनेक महिन्यांपासून शोधकार्यात गुंतलं होते. 


'या' पवित्र दगडापासून बनणार प्रभू रामाची मूर्ती


हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात. भगवान राम आणि माता सीता यांच्या मूर्तीसाठी कोणता दगड योग्य असेल, हे ठरवण्याचा आणि दगडाचा शोध सुरू झाला. आता अखेरीस यावर शिक्तामोर्तब झाला आहे. राम जन्‍मभूमि मंदिर निर्माण समितीने दिलेल्या माहितीनुसार, प्रभू राम आणि सीत मातेची मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवली जाणार आहे. या दगडाच्या शोधात एक पथक गेल्या अनेक महिन्यांपासून मेहनत घेत होते. काही लोक अनेक बनावट शाळीग्राम दगडही घेऊन आले होते. पण, आता प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी 600 वर्ष जुना शाळीग्राम दगड सापडला आहे. हा दगड एक लाख वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातं आहे.


येथून आणला जातोय शालिग्राम दगड


राम मंदिराच्या गर्भगृहात राम-सीतेची मूर्तीसाठी शालिग्राम दगड नेपाळमधून अयोध्येत आणला जात आहे. नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे. मूर्तीसाठी या नदीतून दोन मोठे शाळीग्राम खडक बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही खडकांचे वजन 26 आणि 14 टन आहे. हे दगड सुमारे सात फूट लांब आणि पाच फूट रुंद आहेत. या दगडांवर कोरीव काम करून प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यात येणार आहे.






काय आहे शाळीग्राम दगड?


शाळीग्राम दगड नेपाळच्या काली गंडकी नदीत आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आढळतो. साधारणपणे हा मुक्तिनाथ काली गंडकी नदीच्या काठी आढळतो. शास्त्रज्ञांच्या मते शालिग्राम दगड हा एक प्रकारचा जीवाश्म आहे. शाळीग्राम दगडाचे एकुण 33 प्रकार आहेत. हिंदू धर्मानुसार, शाळीग्राम दगड भगवान विष्णूचे स्वरूप आहे. तसेच शाळीग्रामची शिवलिंगाच्या रूपातही पूजा केली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ayodhya Ram Mandir : पुढच्या वर्षी जानेवारीत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार? अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय?