Ayodhya MP Awadhesh Prasad : अयोध्येत एका दलित मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. अयोध्येतील मिल्किपूर मतदारसंघात काही दिवसांत मतदान होणार असतानाच ही अत्याचाराची घटना समोर आलीये. दलित युवतीचे शव भयावह स्थितीत आढळून आले आहेत. तिचे दोन्ही डोळे काढून टाकण्यात आले आहेत. शिवाय, शरिरावर देखील अनेक जखमी असल्याचे समोर असून अनेक हाडेही मोडलेल्या स्थितीत आहेत. दरम्यान, या घटनेवर भाष्य करत असताना अयोध्येचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत टाहो फोडलाय.
आता आम्ही देशापुढे जाऊन काय बोलणार? : अवधेश प्रसाद
दलित युवतीची हत्या झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अवधेश प्रसाद म्हणाले, "आत्तापर्यंत मी निर्भया हत्याकांडाबाबतचे ह्रदयद्रावक घटना ऐकत होतो. काल मी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलो होतो. लोकांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे", असं म्हणत समाजवादी पक्षाचे खासदार पत्रकार परिषदेत रडू लागले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आता आम्ही देशापुढे जाऊन काय बोलणार? देश आम्हाला याबाबत विचारणा करेल.
रडत असताना अवधेश प्रसाद म्हणाले, एका दलित मुलीला विवस्त्र करुन काय काय करण्यात आले. तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण निर्भयापेत्रा भयंकर आणि गंभीर आहे. मी त्या मुलीच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. तिच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तिचा अंत्यविधी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार होऊ शकला नाही. तिचा दफनविधी करण्यात आलाय.
पोलिसांनी कुटुंबियांच्या माहितीकडे लक्ष दिले असते तर मुलीचे प्राण वाचले असते - अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव याबाबत बोलताना म्हणाले, 'अयोध्येतील ग्रामसभा सहानवन (सरदार पटेल वॉर्ड) येथे 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दलित कुटुंबातील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. तिचे दोन्ही डोळे फोडलेले आहेत. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. तिला अमानुष वागणूक दिली गेली. प्रशासनाने तीन दिवस आधीच कुटुंबियांच्या माहितीकडे लक्ष दिले असते तर मुलीचे प्राण वाचू शकले असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या