नवी दिल्ली : भारतातील स्त्रिया पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. बर्‍याच प्रसंगी महिलांनी स्वत: ला सिद्ध केले आहे, जिथे आतापर्यंत त्यांची उपस्थिती नगण्य होती. आता असं कोणतंय क्षेत्र नसेल की तिथे स्त्रिया नाहीत. अलीकडेच जम्मू-काश्मीरची आयशा अजीज ही देशातील सर्वात तरुण महिला पायलट बनली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी ती व्यायसायिक पायलट बनली आहे.


आयशाने वयाच्या 16 व्या वर्षी 2011 मध्ये स्टुडंट पायलटचं परवाना तिने मिळवला होता. आयशा याबाबत सांगते की, मला विमानाने प्रवास करणे आणि लोकांना भेटायला आवडतं. म्हणूनच मी पायलट होण्याचं ठरवलं होतं. पायलट बनण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या दृढ असणे महत्वाचे आहे.





आयशाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तिने बॉम्बे फ्लाइंग क्लबकडून पायलटचं प्रशिक्षण घेतले आहे. येथून पायलटचा परवानाही तिला मिळाला. प्रशिक्षणाच्या काळात आयशा संपूर्ण आठवडा शाळेत जात असे आणि शनिवार - रविवार दोन दिवशी विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घ्यायची.





आयशाला सिंगल इंजिन 152 आणि 172 विमानांचे उड्डाण करण्याचा अनुभव आहे. 200 तासांचं उड्डाण पूर्ण केल्यानंतर तिला व्यावसायिक पायलटचा परवाना देण्यात आला आहे. आयशाच्या म्हणण्यानुसार ती सुनीता विल्यम्सला आपला आदर्श मानते. आयशाने तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले.