औद्योगिक क्षेत्र |
वेतन वाढीचे प्रमाण (टक्क्यांमध्ये) |
कंज्यूमर इंटरनेट |
12.4 |
लाईफ सायन्स (Medical, Paramedical, Pharmacy) |
11.3 |
प्रोफेशनल सर्व्हिसेस |
10.9 |
केमिकल्स |
10.3 |
मनोरंजन |
10.3 |
ऑटोमोटिव्ह |
10.3 |
कंज्यूमर प्रोडक्ट्स |
10.2 |
इंजिनिअर/ मॅन्यूफॅक्चरिंग |
9.9 |
आयटीईएस |
9.9 |
हायटेक/ माहिती तंत्रज्ञान |
9.7 |
रिटेल |
9.4 |
आरई. इन्फ्रास्ट्रक्चर |
9.2 |
हॉस्पिटॅलिटी/क्यूएसआर |
9.0 |
टेलिकम्यूनिकेशन सर्व्हिसेस |
8.9 |
इंजिनिअरिंग सर्व्हिसेस |
8.9 |
ऊर्जा |
8.9 |
मेटल्स |
8.5 |
आर्थिक संस्था |
8.1 |
ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक, शिपिंग |
8.0 |
सिमेंट |
7.6 |
वेतन वाढीत 9.5 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2017 10:47 PM (IST)
NEXT
PREV
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक विकासावर परिणाम होत असताना, दुसरीकडे चालू वर्षी नोकरदार वर्गाला दिलासा देणारी बातमी आहे. कारण यंदा जवळपास 10 टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर कमी असला, तरी तो समाधानकारक असल्याचे बोललं जात आहे.
एऑन ह्यूट या रिसर्च एजन्सी केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2017 मध्ये विविध क्षेत्रातील नोकरदारांना मिळणाऱ्या पगारात 9.5 टक्क्यांची वाढ होऊ शकते. गेल्या काही वर्षात पगार वाढीचे प्रमाण कमी जास्त होत असताना, एजन्सीचा हा अंदाज नोकरादार वर्गाला दिलासा देणारा आहे.
गेल्या दहा वर्षातील आकडेवारी पाहिली तर 2007 मध्ये हा दर 15 टक्क्यांवर होता. पण 2009 मधील जागतिक मंदीमुळे हा दर 6 टक्क्यांवर घसरला. 2011 मध्ये यात दुपटीने वाढ होऊन हा दर 12 टक्क्यांवर पोहोचला. पण त्यानंतरच्या वर्षांमध्ये हा अकडा 10 टक्क्यांवर घसरला, आणि अनेक वर्षे तिथंच टिकून होता. 2016 मध्ये यात काही अंशांनी वाढ होऊन तो 10.3 टक्क्यांवर पोहोचला.
एजन्सीच्या मते, हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांच्या तुलनेत भारतीय उद्योग जगतात स्थिरता दर्शवतं. कारण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या वर्षातील ब्रेक्झिट आणि नुकतेच अमेरिकेतील सत्ता परिवर्तनामुळे, शिवाय नोव्हेंबरमधील देशातील नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. पण या सर्व घटनांचा भारतीय उद्योग विश्वाने समर्थपणे मुकाबला केला.
एजन्सीचे सहकारी आनंदोरुप घोष यांच्या मते, ''राजकीय स्थित्यंतरे आणि आर्थिक अडथळे यामुळे कामकाजावर परिणाम झाला. मात्र, या वर्षी वेतन वाढीची गती मंदावताना दिसत आहे, आणि याची जागा उत्पादन आणि प्रदर्शनाने घेतली आहे.''
वास्तविक, अनेक कंपन्यांमध्ये वेतन वाढीचा दर हा महागाई दरावर आधारीत नसतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये किरकोळ बाजारपेठेतल्या महागाई दरात घट झाल्याने, त्याचा आधार घेत, अनेक कंपन्यांनी आपले पगारांचे बजेटही आखडतं घेतलं.
याशिवाय या संशोधनातून चांगल्या कामगारांची टक्केवारीही घटली असल्याचे समोर आलं आहे. या दरात घट होऊन 7.5 टक्के झाली आहे. गेल्या 21 वर्षातील सर्वात मोठी घट असल्याचं एजन्सीचं म्हणणं आहे.
तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षात नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे. 2016 मध्ये हा दर 16.4 टक्के होता. तर काही चतुर मंडळींमध्ये एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडण्याचे प्रमाण 7.3 वरुन 12.3 टक्क्यांवर पोहोचले होते. यासाठी पुढे जाण्याच्या मर्यादित संधी, आणि जबाबदाऱ्यांमध्ये झालेली वाढ ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या क्षेत्रात किती पगार वाढू शकेल?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -