एक्स्प्लोर
2019 विसरा आणि 2024 च्या तयारीला लागा : अब्दुल्ला
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीचे कला हाती येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील कल पाहता मोदी लाट अजूनही कायम आहे. उत्तर प्रदेशात भाजपने विरोधकांचा अक्षरश: सुपडासाफ केला आहे.
या कलांवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यापैकी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. आपल्याला 2019 विसरुन 2024 च्या निवडणुकीची तयार करायला हवी, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या अविश्वनीय कामगिरीबाबत ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलं आहे. "सद्यस्थिती पाहाता 2019 विसरुन जा आणि 2024 ची तयारी करा, असं अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे."
https://twitter.com/abdullah_omar/status/840423721760313344
आणखी ट्वीटमध्ये ते म्हणतात की, "सध्या संपूर्ण भारतात मोदींसारखा दुसरा नेता नाही. असा कोणताही नेता नाही जो 2019 मध्ये मोदी आणि भाजपला टक्कर देईल."
https://twitter.com/abdullah_omar/status/840423001615040512
उत्तर प्रदेशातील मोदी लाट तज्ज्ञ आणि विश्लेषक कसे काय विसरले? हे छोट्या डबक्यातील तरंग नाही तर त्सुनामी आहे, असं ट्वीटही ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.
https://twitter.com/abdullah_omar/status/840434322561687553
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement