एक्स्प्लोर

केजरीवालांचे मोदींच्या पावलावर पाऊल, 'मन की बात'प्रमाणेच 'टॉक टू AK'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही एक नवीन कार्यक्रम सुरु केला आहे. दर महिन्याला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधतात. पण आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'टॉक टू AK' हा नवा कार्यक्रम आजपासून दिल्लीत सुरु होत आहे. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजता आहे. हा कार्यक्रम महिन्यातून किती दिवस प्रसारित करण्यात येणार याबाबत दिल्ली सरकारने स्पष्ट केले नसले तरी, हा कार्यक्रम मोदींच्या 'मन की बात'प्रमाणेच महिन्यातून एकदाच प्रसारित करण्यात येईल असे बोलले जात आहे.   प्रसिद्ध संगितकार विशाल ददलानी या कार्यक्रमात मॉडरेटरची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमावेळी अरविंद केजरीवाल कार्यक्रम निर्मात्यांनी आणि दिल्ली सरकारने ठरवलेल्या प्रश्नांसोबतच फोन इन कॉलमधील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.   मुख्यमंत्री केजरीवालांना प्रश्न विचारता यावेत, यासाठी 011-23392999 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी talktoak.com ही नवी वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे. तसेच +91-81303344141 या क्रमांकावर एसएमएस करून प्रश्न विचारता येणार आहेत.   हा कार्यक्रम दिल्ली सचिवालयात रेकॉर्ड होणार असून, यूट्यूब आणि वेबसाईटवरही हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावरून राजकारणासही सुरुवात झाली असून भाजपने विशाल ददलानी यांच्या लोकप्रियतेचा आधार घेऊन कार्यक्रम हिट करण्याच्या प्रयत्नात केजरीवाल असल्याचे बोलले जात आहे.   दरम्यान, असे असले तरी या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने प्रश्न विचारण्यात येत आहेत. पण यामधील कोणत्या प्रश्नांना केजरीवाल उत्तरे देणार हे गुलदस्त्यातच आहे. पण हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातून संकल्पना घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget