एक्स्प्लोर

Delhi Excise Case : आबकारी धोरण प्रकरणाच्या सुनावणीपासून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा अलिप्त; केजरीवाल म्हणाले, 'सत्याचा विजय'

Arvind Kejriwal : न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा या प्रकरणापासून जरी अलिप्त झाल्या असल्या तरी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

Arvind Kejriwal Excise Case : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री (Arvind Kejriwal) यांच्याशी संबंधित दिल्ली आबकारी धोरण प्रकरणात महत्त्वाचे वळण आले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा (Justice Swarnkanta Sharma) यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून स्वतःला अलिप्त (Recuse) केलं आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी 'सत्याचा विजय झाला, गांधीजींच्या सत्याग्रहाचा पुन्हा एकदा विजय झाला' अशी प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना निर्दोषमुक्त केले होते. त्या निर्णयाविरोधात सीबीआयने (Central Bureau of Investigation) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) अपील दाखल केलं होतं. या अपीलाची सुनावणी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुरू होती.

अरविंद केजरीवाल, स्वर्णकांता शर्मा, आबकारी धोरण प्रकरण, दिल्ली उच्च न्यायालय, सीबीआय अपील, न्यायालयीन अवमान

Swarnkanta Sharma Recusal : न्यायमूर्तींनी स्वतःला सुनावणीतून अलिप्त का केलं?

अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी या प्रकरणाची सुनावणी करू नये, अशी मागणी केली होती. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या मुलाचे नाव केंद्र सरकारच्या पॅनलवरील वकिलांमध्ये असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता. तसेच न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आक्षेप आपने घेतला होता.

मात्र, न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केलं की केवळ या आक्षेपांमुळे नव्हे, तर न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरू केल्यामुळे मुख्य प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येत आहे.

Arvind Kejriwal Contempt Proceedings : आप नेत्यांविरोधात फौजदारी अवमानाची कारवाई

न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया (Manish Sisodia), संजय सिंह (Sanjay Singh), सौरभ भारद्वाज (Saurabh Bharadwaj), दुर्गेश पाठक, विनय मिश्रा आणि इतरांविरोधात फौजदारी अवमानाची कार्यवाही सुरू केली आहे. सोशल मीडियावर न्यायमूर्तींविषयी अपमानास्पद आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Justice Swarnkanta Sharma : 'प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न'

न्यायमूर्ती शर्मा यांनी निरीक्षण नोंदवताना सांगितलं की, कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याऐवजी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी सोशल मीडियावर नियोजित मोहीम राबवण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यायालयाच्या अधिकाराला कमी लेखण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

CBI Appeal : आता दुसऱ्या न्यायाधीशांसमोर सुनावणी

या घडामोडीनंतर सीबीआयचे अपील आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी जाईल. त्यामुळे अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांची एक मागणी मान्य झाल्याचे मांले जात असलं तरी त्यांच्याविरोधातील न्यायालयीन अवमान प्रकरण कायम राहणार आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
Mohan Bhagwat On LGBTQ Marriage : समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
समलैंगिक विवाहाला संघाकडून संमती मिळेल का? Gen Z च्या प्रश्नावर मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget