Arunachal : अरुणाचल हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती समोर, पायलटने आधीच केला होता ATC ला कॉल, तपासात कळणार खरं कारण
Arunachal Helicopter Crash Update: अरुणाचल हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती समोर येतेय. अपघातापूर्वी पायलटने एटीसीला कॉल केला होता.

Arunachal Helicopter Crash Update : अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात शुक्रवारी लष्कराचे हेलिकॉप्टर (Helicopter Crash) कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात दोन वैमानिकांसह पाच जण होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एएनआयच्या ताज्या वृत्तानुसार, पाचव्या व्यक्तीसाठी शोध मोहीम अजूनही सुरू आहे. अरुणाचल हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत मोठी माहिती समोर येतेय. अपघातापूर्वी पायलटने हेलिकॉप्टरमधील बिघाडाची माहिती एटीसीला दिली होती. लष्कराच्या माहितीनुसार, अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे मुख्य लक्ष विमान अपघाताच्या तांत्रिक बिघाडावर असेल. अपघातादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या चार जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
Arunachal Pradesh chopper crash yesterday | Search and rescue mission concludes with the recovery of the fifth and last body: Defence PRO, Tezpur pic.twitter.com/LqRcKnLXF9
— ANI (@ANI) October 22, 2022
पायलटने आधीच केला होता ATC ला कॉल
लष्कराच्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या उड्डाणा दरम्यान हवामान चांगले असल्याचे सांगण्यात आले. जून 2015 मध्ये हे विमान लष्कराच्या सेवेत सामील झाले होते. अपघातापूर्वी हेलिकॉप्टरच्या पायलटकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) तांत्रिक बिघाडाची माहिती देण्यासाठी कॉल आला होता. दरम्यान, अपघाताचे कारण शोधण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
लिकाबली येथून हेलिकॉप्टरचे उड्डाण
21 ऑक्टोबर (शुक्रवार) सकाळी 10:43 वाजता हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेश-आसाम सीमेवरील लिकाबली येथून उड्डाण केले होते. लष्कराने या हेलिकॉप्टरला 'रुद्र' असे नाव दिले आहे आणि ते एक लढाऊ म्हणजेच अटॅक रोल हेलिकॉप्टर आहे, ज्यामध्ये दोन पायलट होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये दोन्ही वैमानिकांव्यतिरिक्त ३ जण होते, असे लष्कराने अधिकृतपणे सांगितले नव्हते
अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही
लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या अपघाताची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि हवाई दलाने तात्काळ बचाव मोहीम सुरू केली, प्राथमिक माहितीत अपघाताचे कारण समजू शकले नाही. मात्र आता अपघाताचे कारण शोधण्यासाठी तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यात खरं कारण कळू शकेल.
शोध आणि बचाव कार्यात स्थानिक लोकांकडून मदत
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळील डोंगरावर कोसळले. अप्पर सियांगचे पोलिस अधीक्षक जुम्मर बसर यांनी सांगितले की, घटनेनंतर पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ते म्हणाले की या परिसराशी परिचित असलेल्या स्थानिक लोकांनी देखील शोध आणि बचाव कार्यात मदत केली.
























