एक्स्प्लोर

यशवंत सिन्हांना 80 व्या वर्षीही पदाची लालसा, नाव न घेता अरुण जेटलींचा टोला

70 वर्षांचा भारत, तीन वर्षांचं मोदी सरकार आणि वयाच्या 80 व्या वर्षीही रोजगार, असं या पुस्तकाचं शीर्षक पाहिजे होतं, असं म्हणत जेटलींनी यशवंत सिन्हांना टोला लगावला.

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, अशी टीका करणाऱ्यांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिलं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी नाव न घेता उत्तर दिलं. यशवंत सिन्हांना वयाच्या 80 व्या वर्षीही पदाची लालसा आहे, असा टोला जेटलींनी नाव न घेता लगावला. जेटली ‘इंडिया@70 मोदी@3.5’ या पुस्तक विमोचन कार्यक्रमात बोलत होते. 70 वर्षांचा भारत, तीन वर्षांचं मोदी सरकार आणि वयाच्या 80 व्या वर्षीही रोजगार, असं या पुस्तकाचं शीर्षक हवं होतं, असं म्हणत जेटलींनी यशवंत सिन्हांना टोला लगावला. देशात चर्चा असलेल्या कथित मंदीला कशाचाही आधार नाही, असा दावा जेटलींनी केला. नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे समर्थक आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत आहे. यासाठी सरकारने चांगले निर्णय घेतले आहेत, असं अरुण जेटली म्हणाले. जीएसटी लागू करण्यासंदर्भातले निर्णय हे सर्वसहमतीने घेण्यात आले. डायरेक्ट टॅक्स गेल्यावर्षीच्या तुलनेत 15.7 टक्के जास्त आला आहे. राजकीय पक्षांना मिळणारा निधीही पारदर्शक व्यवहारांच्या निकषांमध्ये यावा यासाठी सरकार काम करत आहे, असंही जेटलींनी सांगितलं. यशवंत सिन्हांचा सरकारला घरचा आहेर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे मोदी सरकारवर हल्ले सुरुच आहेत. नोटबंदीच्या परिणामांची शहानिशा न करताच जीएसटी लागू करण्याची घाई केली, असा हल्लाबोल यशवंत सिन्हा यांनी आज केला. सिन्हा यांनी काल नोटाबंदी म्हणजे मंदीच्या आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचं म्हणत मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. त्यानंतर आज त्यांनी जीएसटीवरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

संबंधित बातमी : नोटाबंदीनंतर लगेचच जीसएटी का? यशवंत सिन्हांचे हल्ले सुरुच

 

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, रुग्णालयात पाठवलं
UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget