नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या रिक्त पदांच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस ठाकूर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशभरातील उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची 500 पदं रिक्त असल्याची माहिती टी. एस. ठाकूर यांनी दिली.


आपल्याकडे कोर्टरुम रिकामे आहेत. पण त्यात बसण्यासाठी न्यायाधीश नाहीत, असं सांगताना त्यांनी देशभरातल्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची 500 पदं रिकामी असल्याची माहिती दिली. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अखिल भारतीय संमेलनात ते बोलत होते.

दरम्यान, आतापर्यंत एकूण 121 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित नियुक्त्यांचीही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

 बातमीचा व्हिडीओ :