नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमातून आज नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर मोदींची ही पहिलीच 'मन की बात' आहे. त्यामुळे आजच्या या भागाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


'मन की बात' कार्यक्रमाचा हा 26 वा भाग आहे. सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल. दरम्यान, मोदी नेमकं काय बोलणार याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे.

नोटाबंदीला आज 19 दिवस पूर्ण झाले. गेल्या 19 दिवसात देशभरातील अनेक नागरिकांचे व्यवहार कोलमडले. देशात रोज साधारणत: 15 ते 20 हजार कोटी रुपये काढले जायचे. मात्र, आता केवळ 25 टक्केच म्हणजे 4 ते 5 हजार कोटी रुपयेच काढता येत आहेत.

30 नोव्हेंबरपर्यंत एटीएममधील तांत्रिक बदलाचं काम जवळपास 90 टक्के पूर्ण होईल. त्यानंतर रोख रकमेची स्थिती सुधारेल. रोख रकमेची मागणी वाढल्याने नोटांच्या छपाईच्या कामालाही गती देण्यात आली आहे.