Jammu-Kashmir Flood : जम्मू आणि काश्मिरमध्ये बहुतेक भागात पाऊस दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) अलिकडे उत्तराखंड (Uttarakhand), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) पासून जम्मू आणि काश्मिर (Jammu and Kashmir) मधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात 30 जण अडकले होते. सैन्य दलाने बचावकार्य राबवत या अडकलेल्या सर्वांचे प्राण वाचवले.


जम्मू काश्मिरमधील अखनूर येथील चिनाब नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे चिनाब नदी दुथडी भरून वाहत आहे. जोरदार पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जम्मू काश्मिकच्या पूँछ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. यावेळी पुरात अनेक जण अडकले होते. प्रशासनाने पुरात अडकेलेल्या लोकांसाठी बचावकार्य राबवत सर्वांची सुखरुप सुटका करत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. 


लष्कराने पुरात अडकलेल्या 30 जणांची सुटका केली






लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, चांडक बेला भागात आलेल्या पुरात 30 नागरिक अडकल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच लष्कराच्या जवानांचं एक पथकं बचावकार्यासाठी पाठवण्यात आलं. यादरम्यान लष्कराच्या जवानांनी पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथक (SDRF) यांच्यासोबत मिळून नागरिकांना वाचवण्यासाठी मोहीम राबवली.


डोंगराळ भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत


लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं की, दिवसभर बचाव मोहिम राबवण्या आल्यानंतर पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती येथे नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, तर उत्तराखंडमधील चमोली येथे डोंगराचा मोठा भाग खचून भूस्खलन झालं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या