India-China Border Issue : भारत ( India ) आणि चीन ( China ) यांच्यातील सीमावाद ( India-China Conflict ) सर्वज्ञात आहे. दोन्ही देशांमधील समस्या सोडवण्यासाठी चर्चेची 17वी फेरी लवकरच सुरू होणार आहे. याआधी लष्करप्रमुख ( ( Army Chief ) जनरल मनोज पांडे ( Manoj Pande ) यांनी पूर्व लडाखमधील ( Eastern Lladakh ) परिस्थितीवर मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले आहेत की, 'पूर्व लडाखमधील परिस्थिती स्थिर आहे परंतु बेभरवशाची आहे.' याशिवाय शनिवारी लष्करप्रमुखांनी सांगितलं की चीन सीमेजवळ वेगाने पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.
भारत-चीन संबंधांवर बोलताना भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, चीन काय सांगत आणि काय करत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. हा त्यांच्या स्वभावाचा आणि एक भाग आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. यावर लष्करप्रमुख म्हणाले की, चीनकडून अव्याहतपणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. जनरल पांडे 'चाणक्य डायलॉग्ज' या कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी याबाबत भारत-चीन संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे.
'लडाखमधील परिस्थिती स्थिर आहे परंतु बेभरवशाची'
भारत आणि चीन यांच्यात सुमारे अडीच वर्षांपासून सीमावादावर चर्चा सुरु आहे. लवकरच या चर्चेची 17 वी फेरी होणार आहे. या दरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी सांगितलं की, पूर्व लडाखमधील परिस्थिती स्थिर आहे परंतु बेभरवशाची आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात जनरल पांडे म्हणाले की, 'भारत आणि चीन यांच्यातील लष्करी चर्चेच्या पुढील फेरीत आम्ही प्रामुख्याने डेमचोक आणि डेपसांगचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही चर्चेच्या 17 व्या फेरीसाठी प्रयत्नशील आहोत.'
'चीनसोबतच्या चर्चेच्या पुढील फेरीची वाट पाहतोय'
सीमा भागात भारतीय लष्कराच्या तयारीबाबत लष्करप्रमुखांनी सांगितलं की, 'लष्कराकडून हिवाळी हंगामाला अनुकूल अशी तयारी सुरू आहे. आमच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आमच्या कृतीचं अतिशय काळजीपूर्वक नियोजन करण्याची गरज आहे'. भारत-चीन सीमावाद चर्चेबाबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, आम्ही चीनसोबतच्या 17 व्या फेरीच्या चर्चेची वाट पाहत आहोत.