Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये (Gujarat News) राजकीय बुद्धिबळाचा डाव सुरु झाला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election 2022) 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये (EVM) कैद होणार आहे. गुजरात विधानसभेचा (Gujarat Election) निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. सध्या गुजरातमध्ये सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. 


पण गुजरातमध्ये विधानसभेच्या या निवडणुकीत असे काही मतदारसंघ आहेत. जिथे भाऊ त्याच्या खऱ्या भावाविरुद्ध, वहिनी खऱ्या मेव्हणीविरुद्ध, तर मुलगा त्याच्या वडिलांविरुद्ध निवडणूक लढवत आहे. अशा उमेदवारांनी गुजरातमधील निवडणूक रंजक बनवली आहे. तसेच, यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


दोन सख्ख्ये भाऊ निवडणुकीच्या रिंगणारत एकमेकांविरोधात उभे 


अशीच एक जागा भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमधील. ही जागा भाजपसाठी सुरक्षित जागा मानली जाते, मात्र काँग्रेसनं खेळलेल्या एका डावानं या ठिकाणी भाजपची चिंता वाढवली आहे. भाजपनं जागेवर विद्यमान आमदार ईश्वरसिंह पटेल यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसनं आपला डाव टाकत विद्यमान आमदारांचे धाकटे बंधू विजयसिंह पटेल यांना तिकीट देऊन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन सख्ख्ये भाऊ आमनेसामने आल्यानं निवडणुक रंगात येणार आहे. 


रवींद्र जडेजाची पत्नी आणि बहीण आमने-सामने


जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपनं भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे. पण रिवाबा सोलंकी यांची नणंद आणि जाडेजाची मोठी बहीण नयना त्यांना उघडपणे विरोध करत आहेत. नैना यांनी काँग्रेसचे उमेदवार दीपेंद्र सिंह जाडेजा यांना पाठिंबा जाहीर केला असून त्यांसाठी प्रचारही करत आहेत. दरम्यान, नैना गुजरात महिला काँग्रेसच्या महासचिव आहेत. तसेच, जामनगरमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. अशा स्थितीत नणंद आणि भावजय यांच्यातील राजकीय लढाई खूपच रंजक बनली आहे. 


झगडिया मतदारसंघात पिता-पुत्रांची लढत


सूरत जिल्ह्यातील गुजरातमधील झगडिया (Jhagadia) विधानसभा मतदारसंघात पिता-पुत्रांमध्ये रोमांचक लढत होत आहे. ही राजकीय लढाई गुजरातचे सुप्रसिद्ध नेते आणि भारतीय आदिवासी पक्षाचे (Bharatiya Tribal Party) प्रमुख छोटू भाई वसावा आणि त्यांचा मुलगा महेश वसावा यांच्यात होत आहे. छोटू भाई वसावा हे झगडिया मतदारसंघातून बीटीपीचे उमेदवार आहेत, तर त्यांचा मुलगा महेश वसावा जनता दल यूचे उमेदवार आहेत. झगडिया जागेवर पिता-पुत्रांमधील ही लढतही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gujarat Election: पंतप्रधान मोदी, गडकरी, फडणवीस यांच्यासह गुजरातमध्ये भाजपचे 40 स्टार प्रचारक