Arif Bhaijaan Passess away: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा (Chhota Shakeel) मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Arif Bhaijaan Passess away) झाल्याची घटना घडली आहे. आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. पोलिसांनी तातडीनं त्याला उपचारासाठी जे. जे रुग्णालयात (JJ Hospital Mumbai) दाखल केलं होतं. मात्र, उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. 


गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ भाईजानला अटक केली होती. आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मे 2022 रोजी आरिफला अटक केली होती.


महत्वाच्या बातम्या:


Underworld Don Dawood Ibrahim: "भाई 1 हजार टक्का फीट, मौत की अफवाहें गलत"; दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा दावा