नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (Archaeological Survey of India) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधनाला लवकरच सुरुवात होणार आहे. पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देशातील 15 राज्यांमधील 31 ठिकाणी उत्खनन करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्खननात पांडवकालीन  बागपत, पुराना किल्ला, राखी गढी या ठिकाणी मुख्यतः शोध घेतला जाणार आहे. या उत्खननात अनेक वर्षांपूर्वीपासून दडलेल्या संस्कृतीचा शोध घेतला जाणार आहे. ज्या ठिकाणी हो उत्खनन केलं जाणार आहे त्याची यादी पुरातत्व विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. 


हजारो वर्षांपूर्वी भारतात हडप्पा संस्कृती उदयास आली, नंतर ती काळानुसार लोप पावली. पण आजही या संस्कृतीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. या संस्कृतीची पाळेमुळे इतकी खोलवर गेली आहेत की आजही अनेक ठिकाणी त्याचा पाऊलखुणा सापडतात. देशाची हीच संस्कृती, हाच वारसा जगासमोर आणण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग सातत्याने प्रयत्नशील असतं. मग ती सिनौलीमधील 4000 वर्षांपूर्वीची संस्कृती असो वा हरयाणातील राखी गढीत अलिकडेच सापडलेले जुने अवशेष असो. आता अशाच प्रकारच्या नव्या गोष्टी समोर आणण्यासाठी 15 राज्यांतील 31 ठिकाणी नव्यानं उत्खनन करण्याचा निर्णय पुरातत्व खात्याने घेतला आहे. 


 






उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील तिलवारा सकिन गावात मौर्य कालीन नाणी तसेच  चांदीची नाणी सापडली आहेत. तसेच मौर्य आणि शिंगू साम्राज्याच्या काळात वापरली गेलेली मातीची भांडीदेखील खोदकामावेळी सापडली आहेत.


दिल्लीमधील पुराणा किल्लासुद्धा या नव्या संशोधनाचा भाग असणार आहे. यापूर्वीच केंद्राने राखी गढी तसेच इथे ठेवलेल्या अवशेषांसाठी एक संग्रहालय बनवले आहे. या उत्खननात 30 मीटरपेक्षा जास्त खोल उत्खनन करुन नवीन संस्कृती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


पुरातत्व खात्याने जाहीर केलेल्या या 31 ठिकाणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील तीन, उत्तर प्रदेशमधील तीन, आणि मध्य प्रदेशातील तीन ठिकाण निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील मुरैनामधील बटेश्वर मंदिरदेखील संशोधनासाठी निवडले गेले आहे. याशिवाय पुरातत्व खात्याकडून नवीन नोंद केल्या जाणाऱ्या अवशेषांच्या ठिकाणीदेखील उत्खनन केले जाणार आहे.


पुरातत्व खात्याकडून उत्खनन करण्यात येणाऱ्या या यादीमध्ये दिल्लीचा पुराणा किल्ला, बेगमपुरातील बिबी का मकबरा, हरयाणातील राखीगडी, अदिचल्लानूर आणि कच्छच्या आखाताचा समावेश असेल. विजयनगरमधील पान सुपारी बाजार, ओल्ड गोव्यातील सेंट ऑगस्टीन चर्च आणि ग्वाल्हेरमधील मानसिंह पॅलेस या ठिकाणीही उत्खनन केलं जाणार असल्याची माहिती पुरातत्व खात्याने दिली आहे.   


ही बातमी वाचा :