April Fools Day 2023 : मार्च महिना संपून जसा एप्रिल महिना जवळ येऊ लागतो तशी 'एप्रिल फूल डे' (April Fools Day) ची चाहूल लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एप्रिल फूल डे' 1 एप्रिलला म्हणजेच शनिवारी साजरा केला जाणार आहे. ही एक वार्षिक प्रथा आहे ज्यामध्ये लोक एकमेकांवर खोड्या करतात, चेष्टा, थट्टा, मस्करी विनोद करतात. यासाठी एप्रिल फूल डेची क्रेझ तरूणाईत फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अनेकजण आपल्या मित्र-मैत्रीणीची थट्टा कशी करायची याचं प्लॅनिंग आधीपासूनच करतात. मात्र, अतिशय गमतीशीर वाटणारा हा दिवस नेमका का साजरा केला जातो? याचं कारण तुम्हाला माहित आहे का? जर, माहित नसेल तर ही रंजक माहिती समजून घ्या. 


एप्रिल फूल डेच्या दोन कथा आहेत


'एप्रिल फूल डे' मागची पहिली कथा


एप्रिल फूल डे साजरा करण्यामागची एक मनोरंजक कथा आहे. 1381 मध्ये एप्रिल फूल डे साजरा करण्यात आला असे म्हणतात. जेव्हा इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा आणि बोहेमियाची राणी अ‍ॅन यांचं लग्न निश्चित झालं होतं. लग्नाची तारीख 32 मार्च 1381 असल्याचे सांगण्यात आले. लग्नाची तारीख ऐकून लोक खुश झाले आणि सेलिब्रेशन करू लागले. पुढे त्यांना कळले की कॅलेंडरमध्ये 31 मार्च ही तारीखच नाहीये. 31 मार्चनंतर 1 एप्रिल येतो, तेव्हापासून या दिवसाला एप्रिल फूल डे म्हटले जाते.


'एप्रिल फूल डे' साजरा करण्यामागची दुसरी कथा


यामागची दुसरी कथा अशी आहे की, एप्रिल फूल डेची ओळख युरोपमध्ये 1582 मध्ये झाली. जेव्हा फ्रान्सने आपले ज्युलियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये बदलले. खरंतर, आपण जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरियन आहे. ज्यामध्ये नवीन वर्ष 1 जानेवारी पासून सुरु होते. हे कॅलेंडर पोप ग्रेगरी XIII ने सुरू केले होते, परंतु हे कॅलेंडर येण्यापूर्वी, नवीन वर्ष 1 एप्रिलला साजरे केले जात होते, याचा उत्सव 25 मार्चपासूनच सुरू असायचा. ग्रेगोरियन कॅलेंडर आल्यानंतर, लोकांना हा बदल स्वीकारता आला नाही आणि त्यांनी नवीन वर्ष 1 एप्रिल रोजीच साजरे केले. या कथेनंतर लोकांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले कारण ते 1 जानेवारी ऐवजी 1 एप्रिलला नवीन वर्ष साजरे करायचे.


1 एप्रिल फूल डे साजरा करण्याची परंपरा आणि विनोद करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून फूल्स डेच्या लोकप्रिय गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यंदाच्याही 1 एप्रिलला एप्रिल फूल डे 2023 साजरा केला जाईल आणि या दिवशी लोक एकमेकांच्या खोड्या करतील. मात्र, याबरोबरच कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची देखील काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :