Air India and Nepal Airlines : जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असलेल्या दोन विमान एकमेकांसमोर आल्यानंतर टक्कर होण्याची शक्यता उद्भवली होती. मात्र वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची विमाने आकाशात इतकी जवळ आली होती की, त्यांची कधीही टक्कर होऊ शकली असती. परंतु वॉर्निंग सिस्टमने वैमानिकांना सतर्क केले, त्यानंतर हा अपघात टळला. 


Air India and Nepal Airlines : तीन कर्मचारी निलंबित 


नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) हवाई वाहतूक नियंत्रक विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणासाठी निलंबित केले आहे. सीएएएनचे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, नेपाळ एअरलाइन्सचे एअरबस A-320 विमान शुक्रवारी सकाळी क्वालालंपूरहून काठमांडूला येत होते. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान नेपाळला येत होते. ही दोन्ही विमाने जवळपास एकमेकांना धडकणार होती. मात्र हा अपघात टळला आहे.


याबाबत अधिक माहिती देताना जगन्नाथ निरौला म्हणाले की, एअर इंडियाचे विमान 19 हजार फूट उंचीवरून खाली येत होते. त्याच ठिकाणी नेपाळचे विमान 15 हजार फूट उंचीवर उडत होते. त्यांनी सांगितले की, जेव्हा रडारवर दोन्ही विमाने एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसले, तेव्हा नेपाळ एअरलाइन्सचे विमान 7000 फूट उंचीवर गेले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. घटनेच्या वेळी नियंत्रण कक्षाचे प्रभारी असलेल्या तीन अधिकाऱ्यांना सीएएएनचे निलंबित केले आहे. सध्या एअर इंडियाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.






दरम्यान, 15 जानेवारी रोजी नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान कोसळले होते. यामध्ये 72 जणांचा मृत्यू झाला होता. काठमांडूहून पोखरा येथे उड्डाण करणारे यति एअरलाइन्सचे (Yeti Airlines) एटीआर-72 विमान 15 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता नायगाव येथे कोसळले. विमानातील सर्व 72 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. 


इतर महत्वाची बातमी: