Jahangirpuri Demolition  : दिल्ली पालिकेच्या तोडक कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर बुल्डोझर चालवला जात आहे. जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने तूर्तास स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. मात्र, या आदेशानंतरही देऊनही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे. मशिदीजवळील अतिक्रमण तोडण्याचं काम सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात आहे.






जहांगीरपूरमधील बुल्डोझर कारवाईवर स्थगित करा : सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरी येथे तोडक कारवाई स्थगित करण्याच्या आदेशानंतरही पुन्हा सुरू असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला तात्काळ थांबवण्यास सांगितलं आहे. याचिकाकर्ते दुष्यंत दवे यांनी सांगितलं की, सरन्यायाधीशांना कारवाई अद्याप सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना माहिती देण्यास सांगितलं. आदेशाची प्रत पालिका आणि पोलीस आयुक्तांना देण्यात यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे.


कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी घेतली पोलिसांची भेट


कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष पोलीस आयुक्तांची दिपेंद्र पाठकभेट घेतली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'ही तोडक कारवाई बेकायदेशीर आहे.' त्यांनी पुढे माहिती दिली की, आमच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, सर्वोच्च न्यायालयाने कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतरही कारवाई सुरुच आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha