Delhi Violence News : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांकडून वेगवान तपास आणि कारवाई सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौथी एफआयआर (FIR) नोंदवली आहे. सोमवारी पोलिसांनी आरोपी सोनू चिकना याला अटक केली. सोनू चिकनावर दगडफेकीवेळी गोळीबार केल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि तोडफोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनू चिकनाचा शोध सुरू केला. याप्रकरणी आतापर्यंत 22 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या 22 व्यतिरिक्त आणखी दोन अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. 


आतापर्यंत काय घडलं, वाचा 10 मोठे अपडेट्स...


1. पोलिसांनी याप्रकरणी चौथा एफआयआर नोंदवला आहे. व्हिडीओमध्ये गोळीबार करताना दिसत असलेल्या सोनू चिकनाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. आरोपी सोनू चिकनाची अटक सर्वात महत्त्वाची असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्याचे वर्णन कुख्यात गुन्हेगार असं केलं आहे.
3. पहिली एफआयआर 16 एप्रिल रोजी नोंदवण्यात आली होती. यामध्ये विविध गुन्हेगारी कलमांखाली खटला चालवण्यात आला. दुसऱ्या एफआयआरमध्ये परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमा या आरोपीविरोधात पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तिसरी एफआयआर दाखल करण्यात आली.
4. व्हायरल व्हिडीओमध्ये ज्या शस्त्राने सोनू गोळीबार करताना दिसत आहे, त्याच शस्त्रासह सोनू चिकना याला पोलिसांनी अटक केली आहे.
5. सोनू शेख उर्फ ​​सोनू चिकना याला आज रोहिणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
6. सोनू चिकनाच्या अटकेसह आतापर्यंत एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्सार, अस्लम, जाहिद, शहजाद, मुख्त्यार अली हसन, मोहम्मद अली, अमीर, अक्सर, नूर आलम, जाकीर, अक्रम, इम्तियाज, अहिर, मोहम्मद अली, शेख सौरभ, सूरज, नीरज, सुकेन, सुरेश, सुजित सरकार आणि सलीम चिकना उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
7. या 22 व्यतिरिक्त दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
8. फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे. सोमवारी आठ सदस्यांच्या पथकानं हिंसाचाराच्या ठिकाणाहून नमुने गोळा केले.
9. हिंसाचाराचा आरोप असलेल्या अन्सारचे आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या आरोपांवर दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, 'दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोणीही पक्षाची टोपी घालू शकतो.'
10. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'सरकारच्या इशाऱ्यावर हिंसाचार होत आहे. सरकारला हवं असते तर हिंसाचार झाला नसता. पोलिसांची कारवाई एकतर्फी आहे.'


एफआयआरनुसार, संध्याकाळी 6 वाजता मिरवणूक जामा मशिदीजवळ पोहोचताच अन्सार नावाचा एक व्यक्ती त्याच्या चार ते पाच साथीदारांसह आला आणि मिरवणुकीत सहभागी लोकांशी वाद घालू लागला. बाचाबाची वाढत गेल्यानं परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. यानंतर रस्त्यांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली. लाठ्या, तलवारी घेऊन लोक रस्त्यावर आले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha