एक्स्प्लोर

रामलीला मैदानावर पुन्हा अण्णा हजारे!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे एका नव्या आंदोलनासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णांचं उद्यापासून (शुक्रवार) सत्याग्रह आंदोलन सुरु होणार आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे एका नव्या आंदोलनासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णांचं उद्यापासून (शुक्रवार) सत्याग्रह आंदोलन सुरु होणार आहे. 23 मार्च या शहीद दिनाचं औचित्य साधून अण्णा उद्या आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असेल. जनलोकपाल, निवडणूक सुधारणा या अण्णांच्या इतर जुन्या मागण्यांचाही यात समावेश असणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून अण्णा पहिल्यांदा राजघाटाकडे कूच करतील. त्यानंतर शहीद पार्कला शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात होईल. रामलीला मैदानावर शेवटच्या क्षणी अण्णांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली. मागच्या आंदोलनांच्या अनुभवातून धडा घेत अण्णांनी यावेळी आंदोलनाचं राजकीयकरण होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचं दिसतं आहे. ‘यावेळी कुठल्याही राजकीय व्यक्तीला स्टेजवर चढू देणार नाही, ज्यांना पाठिंबा द्यायचाय ते प्रेक्षकांमधूनच देतील.’ असं अण्णांनी म्हटलं आहे. शिवाय आंदोलनातून पुढे राजकारणात जायचं नाही असं वचन कोअर कमिटीतल्या लोकांकडून घेण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम राहिले. आता केंद्रात अण्णांच्या आंदोलनावेळी कोण मध्यस्थी करणार याची उत्सुकता असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi Australia : मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
मेलबर्नमधील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख; म्हणाले, 'दहशतवादी तळांवरील स्फोटांचे जगभर पडसाद'
Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
Embed widget